Pimpri Vegetable Market Prices: गवार-शेवग्याचे दर उतरले; लिंबू-मिरची महाग

पालेभाज्यांत काहीशी वाढ; मोशी उपबाजारात कांदा 8 रुपये किलो, टोमॅटो 12 रुपये घाऊक दर
Drumsticks
DrumsticksPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री मंडईत रविवार (दि. 22) बाजारात फळभाज्यांचे दर स्थिर होते; मात्र इतके दिवस तेजीत असणाऱ्या गवार आणि शेवगा यांचे दर उतरले आहेत. लिंबू आणि मिरचीच्या दरात वाढ झाली आहे, तर पालेभाज्यांच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. वाटाणा, गाजर 30 ते 40 रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे.

Drumsticks
Pimpri Chinchwad Mobile Theft: पिंपरी-चिंचवडमध्ये मोबाईल चोरीचा वाढता कहर; 12,596 प्रकरणे, केवळ 17% मोबाईल परत

बाजारात पालेभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाले आहेत. कोथिंबीर मेथी, शेपू, पालक यांचे दर 15 रुपये प्रतिजुडी होते. कांदे 100 रुपयांना 5 रुपये किलो विक्री केली जात आहे. लसूण 180 - 200 रुपये, तर आले 60-80 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Drumsticks
National Statistical Office Income Survey: राज्यात दरडोई उत्पन्नाचा सर्वसमावेशक सर्व्हे; शहरी-ग्रामीण भागातील मिळकतीचा अभ्यास

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

रविवारी बाजारात गवार 120 रुपये किलो, शेवगा 120, किलो दराने विक्री केला जात होता. वाटाणा 30 रुपये, टोमॅटो 25, भेंडी 70, फ्लॉवर 30, कोबी 30, मिरची 100, गाजर 30, शिमला 70, लसूण 180 ते 200 रुपये, आले 60 रुपये, वांगी 70, काकडी 30, कारले 70, कांदे 20 ते 25 रुपये किलो, बटाटा 25 ते 30 रुपये, बिन्स 70 रुपये किलो, पावटा 70, लाल भोपळा 30 रुपये, घोसाळी 60, दोडका 70 रुपये, तोंडली 70 रुपये, बीट 30 रुपये, दुधी 50, घेवडा 60 रुपये किलो दर आहेत.

Drumsticks
Maharashtra AI Policy Industrial Areas: राज्यातील उद्योगनगरांत देशातील पहिले ‘एआय धोरण’ लवकरच; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे दर (रुपये) प्रतिजुडी:

कोथिंबीर 15 रुपये, मेथी 15, पालक 15, शेपू 15, राजगिरा 10, पुदिना 10, मुळा 20, चवळई 10, लाल माठ 10, कांदापात 10, करडई 10, आळू पाने 10 रुपये जुडी, चुका 10 रुपये दर आहेत.

फळभाज्यांचे : किलोचे भाव

शेवगा 140 रुपये, गवार 140, पावटा 80, तोंडली 100, वाटाणा 40, बीट 30, दोडका 80, कारली 80, भरताची वांगी 50, भेंडी 80, मिरची 80, फ्लॉवर 50, कोबी 30, वांगी 100, घोसाळे 70, पडवळ 90, दुधी भोपळा 50, पापडी 70, सुरण 80, काकडी 40, सिमला 80, राजमा 50, बिन्स 70, गाजर 40, आवळा 60 ते 70, रताळी 80, टोमॅटो 30, काकडी 40 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

Drumsticks
Kudalwadi Road Dust Issue PCMC: कुदळवाडीत रस्त्याचे काम रखडले; धुळीने नागरिक हैराण

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो)

कांदा 8 रुपये, बटाटा 9, लसूण 80, आले 40, भेंडी 40, गवार 80, टोमॅटो 12, वाटाणा 30, घेवडा 40, दोडका 35, मिरची 60, दुधी भोपळा 25, काकडी 15, कारली 40, गाजर 25, फ्लॉवर 25, कोबी 20, वांगी 40, बीट 25, शेवगा 80, घोसाळी 35, लिंबू 40, शिमला 50, मका कणीस 15 रु. प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 5080, पालेभाजी 72100 (गड्डी), फळे आवक 1342, कांदा 727, बटाटा 651, आले 94, लसूण 11, भेंडी 148, गवार 20, टोमॅटो 1064, वाटाणा 269, घेवडा 48, दोडका 56, हिरवी मिरची 178, दुधी भोपळा 125, काकडी 236, कारली 4, डांगर 33, गाजर 195, फ्लॉवर 338, कोबी 289, वांगी 144, ढोबळी 92, बीट 19, शेवगा 34, लिंबू 73, मका कणीस 55, तोंडली 3, रताळी 2 क्विंटल अशी आवक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news