Raksha Bandhan Rakhi Post Service: रक्षाबंधनासाठी पोस्टाची खास सुविधा; अवघ्या १२ रुपयांत वॉटरप्रूफ कव्हर, देश-विदेशात राखी पाठविणे सोपे

पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख टपाल कार्यालयांत विशेष प्लास्टिक कव्हर उपलब्ध; स्पीड पोस्टने राखी सुरक्षित पाठविण्याची सुविधा
Raksha Bandhan Rakhi Post Service
Raksha Bandhan Rakhi Post ServicePudhari
Published on
Updated on

पिंपरी: रक्षाबंधन हा भाऊ- बहिणीच्या प्रेम, विश्वास, आणि जिव्हाळयाचा पवित्र सण अधिक आनंददायी करण्यासाठी तसेच परदेशात राहणाऱ्या भावंडांपर्यंतही बहिणीची राखी वेळेत आणि सुरक्षित पोहोचावी यासाठी भारतीय टपाल विभागाने राखी पाठविण्यासाठी वॉटरप्रूफ पाकिट उपलब्ध केले आहे. या सुविधेमुळे राखी खराब न होत्या आपल्या लाडक्या भाऊरायापर्यंत पोहोचू शकेल.

Raksha Bandhan Rakhi Post Service
Lonavala Traffic Jam: मिसिंग लिंकनंतरही लोणावळा वाहतूककोंडीतच; ८ ते १० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

पिंपरी- चिंचवड शहरातील प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये अवघ्या १२ रुपयांत विशेष प्लास्टिक कव्हर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. स्पीड पोस्टच्या माध्यमातून देश- विदेशात राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Raksha Bandhan Rakhi Post Service
Kasarwadi Dangerous Wall: कासारवाडीत धोकादायक भिंतीचा विळखा; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटनेची भीती

पिंपरी, आकुर्डी, निगडी, चिंचवड भोसरी, चिखली, सांगवी आदी टपाल कार्यालयांमध्ये हे विशेष कव्हर विक्रीस ठेवण्यात आले आहे. मजबूत आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे पोस्टाच्या प्रवासात राखी सुरक्षित राहण्यास मदत होते. त्यामुळे दूरदेशी असेलेल्या भावंडांपर्यंतही बहिणीच्या प्रेमाचा धागा सुरक्षितपणे पोहोचू शकतो. त्यामुळे पोस्टाने ही सेवा सुरु केली आहे.

Raksha Bandhan Rakhi Post Service
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले; रताळी ८० रुपये किलो, कोथिंबीर जुडी १० रुपयांना

पार्सलच्या वजनानुसार शुल्क:

स्पीड पोस्टच्या सुविधेनुसार राखी पाठविण्यासाठी शुल्क हे पार्सलच्या वजनानुसार आकारले जाते. रक्षाबंधनाच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन अनेक टपाल कार्यलयांमध्ये स्वतंत्र बुकिंग काउंटर सुरु करण्यात आले आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पिंपरी- चिंचवडमधील अनेकजण विदेशात वास्तव्यास आहेत. राखी वेळेत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी आगाऊ राखी पोस्ट करावी. जेणेकरून रक्षाबंधनावेळी राखी आपल्या स्वकीयांपर्यंत पोहोचू शकेल.

Raksha Bandhan Rakhi Post Service
Pimpri Chinchwad Police Transfers: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात १२ नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

भावा-बहिणीच्या अनमोल नात्याच्या सणासाठी अर्थात रक्षाबंधनानिमित्त टपाल विभागाने राखी पाठविण्यासाठी प्लास्टिक कव्हर उपलब्ध करुन दिले आहे. स्पीड पोस्टद्वारे सुरक्षितपणे राखी देश- विदेशात पाठविण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे.

समीर महाजन, प्रशासकीय अधिकारी वरिष्ठ डाक, अधिक्षक.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने परदेशात असणाऱ्या बहीण आणि भावाच्या नात्यातील प्रेम आणखी दृढ व्हावे यासाठी टपाल विभागाच्या वतीने ही सेवा सुरु केली आहे.

नितीन बने, जनसंपर्क पोस्ट विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news