Pimpri Ganeshotsav Ganesh Idols: पिंपरीत बाप्पाच्या आगमनाची लगबग; यंदा कापडी पोशाखातील अनोख्या गणेशमूर्तींची क्रेझ!

जास्वंदीच्या फुलापासून घोडा, पाळणा अन् मोटारीपर्यंत नानाविध रूपे; २ हजारांपासून १५ हजारांपर्यंत घरगुती मूर्तींना मागणी
Ganesh Idols
Ganesh IdolsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, शहरात ठिकठिकाणी मूर्तीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. नागरिकांकडून बाप्पाच्या मुर्तीचे आगाऊ बुकिंग सुरु झाल्याने बुकिंगसाठी भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे.

Ganesh Idols
Pimpri Chinchwad Modified Silencer Action: कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा हातोडा; ५६८ सायलेन्सरचा रोड रोलरखाली चुराडा!

यावर्षी जास्वंदीच्या फुलामध्ये बसलेली, फेटा बांधलेली, घोड्यावर बसलेली, साधूच्या वेशातील वीणा वाजविणारी, पार्वतीच्या मांडीवर बसलेली, मोटारीत बसलेली, संत तुकाराम महाराजांच्या वेशभूषेतील, गिटार वाजविणारी, मूषकावर, मोदकावर, पाटावर, पाळण्यात, नंदी बैलावर, स्वामी समर्थांच्या रूपात, विठ्ठलाच्या रूपात, बालाजीच्या रूपात, पेशवाई, शंकर पार्वतींसमवेत, बालगणेश रूपातील अशी नानाविध रूपातील मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.

Ganesh Idols
Pimpri Chinchwad Investment Fraud: रोज ५०० रुपयांच्या परताव्याचे आमिष; गुंतवणुकीच्या नावाखाली ३३.४४ लाखांची फसवणूक!

यावर्षी शहरात लवकर स्टॉल्स लागल्यामुळे मूर्तीची निवड करण्यासाठी नागरिकांना मोठा अवधी मिळणार आहे. महिना आधीच भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात. सध्या कुंभारवाड्यात व कारखान्यात तयार झालेल्या गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत. काही ठराविक स्टॉल्सवर पेणच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या जातात. या मूर्ती सुबक आणि आकर्षक असतात. म्हणून ग्राहकांची देखील पसंती मिळत आहे.

Ganesh Idols
Pimpri Chinchwad Accepted Corporators Election: पिंपरी-चिंचवड महापालिका सभेतून ‘स्वीकृत’ नगरसेवक निवडीचा विषय गायब; सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

दरवर्षीपेक्षा यंदा शहरात नाविन्यपूर्ण अशा ड्रेपरी घातलेल्या नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. दरवर्षी गणेशमूर्ती तयार करतानाच मातीचे उपरणे, धोतर, शेला, फेटा अशा स्वरूपात तयार करून त्यांना रंगरंगोटी केली जाते. यंदा कापडी पोशाखातील या मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Ganesh Idols
PCMC BJP: भाजप शहराध्यक्षांनी टोचले पदाधिकार्‍यांचे कान

शहरात राजस्थानी कलाकारांनी घडविलेल्या मूर्ती विक्रीस येतात. या मूर्ती खूप स्वस्त असल्यामुळे नागरिकांचा ओढा तेथून मूर्ती घेण्याकडे वाढला आहे. त्याचा परिणाम शहरातील स्टॉल्सवर होताना आढळतो. या मूर्ती दिसायला सुबक आणि किंमतीला कमी असतात. त्यामुळे या मूर्तींना जास्त

मागणी असते.साधारणत: दीड फुटापासून ते तीन फुटांपर्यंतच्या घरगुती मूर्ती स्टॉल्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या मूर्तींची किंमत आकारानुसार २००० रूपयांपासून १५ हजार रूपयांपर्यंत आहेत. या मूर्तींवर विविधरंगी, जरतारी, खडे, कुंदन व टिकल्यांचा वापर करून सुंदर पोशाख तयार केला आहे. शहरात पहिल्यांदाच अशा गणेशमूर्ती पहायला मिळत आहेत. यावर उपरणे, टोपी, शाल, शेला अशी कापडी वस्त्रे असल्याने मूर्ती अधिकच खुलून दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news