Fugewadi Toxic Liquor Case: फुगेवाडी विषारी दारूकांड तपासात मोठा निर्णय; CID पथकाला पोलिस बंदोबस्ताची सक्ती

तपासासाठी घटनास्थळी जाण्यापूर्वी स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त; परिसरात तणाव कायम
CID
CIDPudhari
Published on
Updated on

पिंपरी: फुगेवाडी विषारी दारूकांड प्रकरणाच्या तपासासाठी घटनास्थळी जाणाऱ्या सीआयडीच्या पथकांना स्थानिक पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त सोबत घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दारूकांडानंतर परिसरातील वातावरण अद्यापही संवेदनशील असून, आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नागरिकांमध्ये तीव संताप कायम असल्याने ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

CID
Pawana Closed Water Pipeline Project: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला गती; 15 वर्षांनंतर 1200 कोटींचा मार्ग मोकळा

दोन दिवसांपूर्वी सीआयडीचे (राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे) पथक दारूकांड प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नेलसिंह तख्तसिंग वीरका याला घेऊन तपासासाठी फुगेवाडी येथे आले होते. आरोपी घटनास्थळी पोहोचताच मृतांच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी तीव संताप व्यक्त केला. काहींनी आरोपीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तर, काहींनी त्याच्यावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपीला सुरक्षितपणे तेथून बाहेर काढले.

CID
Pimpri CPCB Registration: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या सोसायट्यांना CPCB नोंदणी बंधनकारक; नियम न पाळल्यास कारवाई

या घटनेनंतर फुगेवाडी परिसरातील संवेदनशीलता लक्षात घेऊन सीआयडीच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय घटनास्थळी न जाण्याचा सल्ला देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. तपासाच्या अनुषंगाने आरोपींना घटनास्थळी आणण्याची आवश्यकता भासल्यास किंवा पंचनामा, पाहणी, पुरावे संकलन यांसारख्या प्रक्रिया कराव्या लागल्यास स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना देऊन आवश्यक बंदोबस्ताची व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला आहे.

CID
PCMC Property Tax Collection: पिंपरी-चिंचवड महापालिकेची दमदार वसुली; 2 महिन्यांत 280 कोटी मालमत्ताकर जमा

दरम्यान, दारूकांडातील मुख्य आरोपी कर्नेलसिंह वीरका याच्या घरावर कारवाई करण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने संबंधित नातेवाईकांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर घरातील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. घरातील फर्निचर, घरगुती वस्तू आणि इतर साहित्य हलविण्याचे काम दिवसभर सुरू होते. संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

CID
Pimple Gurav PMPML Bus Shelter Issue: पिंपळे गुरवमध्ये पीएमपीएलचा नियोजनशून्य कारभार; कोट्यवधींच्या बसशेड असूनही प्रवासी उन्हात

दापोडी पोलिस अलर्ट मोडवर

संभाव्य महापालिका कारवाई आणि परिसरातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन दापोडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, यासाठी पोलिसांकडून परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांमधील संताप, आरोपींच्या घरावरील संभाव्य कारवाई आणि सुरू असलेला तपास या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर असून, परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. आरोपींविरोधातील पुढील कारवाई आणि वीरका यांच्या घराबाबत महापालिकेचा निर्णय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news