Pimpri Crime: अ‍ॅपद्वारे भक्तांवर नजर; मोबाईल कॅमेऱ्यातून बघायचा खासगी क्षण, 'टेक्नॉसेव्ही भोंदूबाबा'चा बिंग असं फुटलं

Crime News Todays: मोबाईल ॲक्सेस घेऊन भक्तांचे चित्रीकरण करणाऱ्या भोंदू बाबाला बावधन पोलिसांकडून अटक
Pune Self Declared Spiritual Guru Arrested
Pune Self Declared Spiritual Guru ArrestedPudhari
Published on
Updated on

Pune Self Declared Spiritual Guru Arrested

पिंपरी: भक्तांच्या मोबाईलमध्ये गुपचूप अ‍ॅप डाऊनलोड करून मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेत त्यांचे खाजगी क्षण पाहणाऱ्या आणि त्यांचे चित्रीकरण करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यूची भीती दाखवत तरुण भक्तांना वेश्या किंवा प्रेयसीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करून तो त्यांच्या हालचाली मोबाईल कॅमेऱ्याद्वारे टिपत होता. या फसवणुकीचा उलगडा एका भक्ताच्या सायबर तज्ज्ञ मित्रामुळे झाला आहे.

प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (२९, रा. सुसगाव, मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या बाबाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३९ वर्षीय भक्ताने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pimpri News)

Pune Self Declared Spiritual Guru Arrested
MIDC Water Bill: एमआयडीसीचे पाणीबिल थकवल्यास पडणार महागात; जिल्हाधिकारी कार्यालय काढणार वसुलीची नोटीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बाबा बावधन परिसरात श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आडून आपली दुकानदारी चालवत होता. 'आपल्याला दिव्यशक्तीची आत्मभूती प्राप्त झाली आहे', असा दावा करत तो भक्तांना 'तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यांत अटळ आहे' असे भाकीत सांगून मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता.

यानंतर मंत्र जाप करण्याच्या बहाण्याने तो भक्तांना एकांत ठिकाणी बसवून त्यांचा मोबाईल हातात घेत. पासवर्ड विचारून मोबाईलमध्ये गुपचूप 'एअर ड्रॉइड कीड' हे हिडन अ‍ॅप डाऊनलोड करून ठेवत असे. हे अ‍ॅप बॅकग्राऊंडमध्ये कार्यरत राहून बाबाला संबंधित भक्तांचा कॅमेरा, आवाज, लोकेशन यावर थेट नियंत्रण मिळवून देत होते.

या अ‍ॅपच्या साहाय्याने बाबा भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातले आहेत, सध्या कुठे आहेत, त्यांनी दिवसभरात काय काय केले, याबाबत माहिती सांगत होता. यामुळे भक्तांचा त्याच्यावरील विश्वास अधिक बळकट झाला होता.

या प्रकाराचा सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे, काही तरुण भक्तांनी मृत्यूपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय विचारल्यावर बाबाने त्यांना “प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा” असा आगळावेगळा सल्ला दिला. विशेष म्हणजे, शरीर सबंध सुरू असताना मोबाईल दिशादर्शक (नेव्हिगेशन) सुरू करून तो मोबाईल विशिष्ट कोनातून ठेवण्यास सांगत असे. त्याद्वारे मोबाईल कॅमेराच्या माध्यमातून बाबा त्यांचे खासगी क्षण पाहत आणि त्याचे चित्रीकरण करत होता.

Pune Self Declared Spiritual Guru Arrested
Water Supply Cut: शहरातील सोळा हाऊसिंग सोसायट्यांचे पाणी बंद; एसीटीपी बंद असल्याने पुरवठा खंडित

दरम्यान, एका तरुण भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी आपल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मित्राला दिला. त्या मित्राने लॅपटॉपच्या साहाय्याने मोबाईल तपासला असता त्यात एक संशयास्पद हिडन अ‍ॅप सापडले. त्याच्या मदतीने मोबाईल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा संबंधित तरुणाला आठवले की, आपण मोबाईल केवळ त्या बाबाच्याच हातात दिला होता. यानंतर त्या तरुणाने इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता, त्यांच्याही मोबाईलमध्ये तेच अ‍ॅप असल्याचे निष्पन्न झाले.

आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व भक्तांनी एकत्र येऊन बाबाला जाब विचारला. त्यावेळी बाबाची घाबरगुंडी उडाली आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली. मात्र, एका तरुण भक्ताने थेट डायल ११२ क्रमांकावर कॉल करून याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संबंधित बाबाला ताब्यात घेतले. त्यानंतर शुक्रवारी (दि. २८) रात्री बावधन पोलीस ठाण्यात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक भक्तांनी आपल्यावरही अशाच प्रकारे प्रयोग झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या अ‍ॅपची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी भक्तांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य आढळले. त्यानुसार, बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात आयटी अ‍ॅक्ट आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास बावधन पोलिस करत आहेत.

अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहावे. कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये. तसेच, बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या.

—अनिल विभूते, वरिष्ठ निरीक्षक, बावधन पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news