Water Supply Cut: शहरातील सोळा हाऊसिंग सोसायट्यांचे पाणी बंद; एसीटीपी बंद असल्याने पुरवठा खंडित

एसटीपी सुरू न केल्यास नळजोड खंडीत करण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
Water Supply Cut
शहरातील सोळा हाऊसिंग सोसायट्यांचे पाणी बंद; एसीटीपी बंद असल्याने पुरवठा खंडित Pimpri News
Published on
Updated on

पिंपरी: शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना वारंवार आवाहन करूनही मैलासांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित न करणार्‍या 16 सोसायट्यांचा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पिण्याच्या पाण्याचे नळजोड तोडले आहेत. एसटीपी सुरू न केल्यास नळजोड खंडीत करण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत शहरवासीयांना 620 ते 630 एमएलडी पाणी एका दिवसाला पुरवठा केला जातो. वाढत्या लोकसंख्येला हे पाणी पुरत नाही. मागील सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. लोकसंख्या वाढली. (Latest Pimpri News)

Water Supply Cut
Pimple Guruv: संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनजवळच पाण्याचे तळे; उपाययोजना करणे गरजेचे

मात्र, पाण्याची उपलब्धतता वाढली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होते. शहरातील अनेक मोठ्या सोसायट्यांना पाण्याचे टँकर, बोअरवेलच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.

एकत्रीत बांधकाम व विकास नियमावलीनुसार (युडीसीपीआर) 20 हजार चौरस मीटरपुढील क्षेत्रफळावरील, हाऊसिंग सोसाट्यांना सांडपाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात 456 मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. यामधील 264 सोसायट्यांमधील एसटीपी प्रकल्प सुरू आहेत. तर, एसटीपी सुरू करण्याचे वारंवार आवाहन करूनही 184 सोसायट्यांमधील एसटीपी विविध कारणांनी बंद आहेत.

Water Supply Cut
Pimpri: 10 वर्षांपासून हिंजवडीसह सात गावे समाविष्ट करण्याचे प्रकरण भिजत; महापालिकेच्या प्रस्तावाला 2015 पासून रेड सिग्नल

आत्तापर्यंत शहरातील विविध भागातील 16 मोठ्या सोसायट्यांचे नळजोड तोडण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल यांनी दिली.

या हाऊसिंग सोसायटीचे नळ तोडले

मोशी येथील सिल्व्हर सत्यम, ब्लू बेल्स, सह्याद्री श्रुबेरी, शंकेश्वर क्रिमसन, लव्ह नेस्ट आणि सेरेन होम्स रावेत येथील साई सरोज आणि आशीर्वाद होम्स, वाकड येथील श्रीगणेश इम्पेरिया, सिल्व्हर स्कायस्केप, लोरेले सहकारी संस्था, चिंचवड येथील सुखवानी पॅसिफिक, चिखली येथील जीकेएसटी कंवर राम पॅलसिओ फेज-वन आणि फेज-टू, डुडुळगाव येथील अक्षा अमुल्यम आणि कॉनकार्ड अमुल्यम या हाउसिंग सोसायटीचे नळजोड तोडण्यात आले आहेत.

कारवाई सुरूच राहणार

एसटीपी बंद असलेल्या 50 हाऊसिंग सोसायट्यांचे नळजोड खंडीत करण्याची कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत 16 सोसायट्यांचे पाणी तोडण्यात आले आहे. उर्वरित सोसायट्यांंचे नळजोड खंडीत करण्यात येणार आहे. सोसायटीच्या पदाधिकारी व सभासदांनी तात्काळ एसटीपी सुरू करून घ्यावेत, असे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news