Pimpri Cow Theft Case: पिंपरीतील गायचोरी प्रकरणाला ‘कुर्ला कनेक्शन’; सीसीटीव्हीतील रिट्झ कारच्या आधारे संशयित ताब्यात

गुंगीकारक औषधाचा वापर करून गाय चोरल्याचा संशय; सराईत आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांकडून तपास सुरू
Cow
CowPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी गावातील वैभवनगरी येथून गुंगीकारक औषध पाजून गायचोरी करणाऱ्या टोळीचे 'कुर्ला कनेक्शन' उघडकीस आले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली ग्रे रंगाची मारुती सुझुकी रिट्झ कार मुंबईतील कुर्ला येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सीसीटीव्हीतील वाहनाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत पिंपरी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

Cow
Pimpri Chinchwad Construction Technology: पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम क्षेत्रात तंत्रज्ञानाची क्रांती; विटांपासून स्मार्ट होमपर्यंतचा आधुनिक प्रवास

या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे गायचोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी अभिजित ज्ञानेश्वर शिंदे (३७, रा. मंजूळ दामोदर निवास, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर, पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Cow
Pimpri Chinchwad Electric Metro Bus: पिंपरी-चिंचवडमध्ये धावणार इलेक्ट्रिक मेट्रो बस; एचसीएमटीआर आणि बीआरटी मार्गाला मुख्यमंत्री फडणवीसांची मंजुरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका कडबाकुट्टी केंद्र, जगदंबा स्वीटहोम शेजारी, वैभव नगर, पिंपरी गाव येथे सोमवार (दि. २७) रात्री हा प्रकार घडला आहे. घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिट्झ कारमधून तीन जण उतरल्याचे दिसून येत आहे. एका आरोपीने गायीच्या मानेत गुंगीचे इंजेक्शन टोचले. त्यानंतर बाटलीतील गुंगीकारक द्रव्य पाजले. काही क्षणांत गाय शांत होताच तिघांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये टाकून पलायन केले. चोरीस गेलेली काळ्या व पांढऱ्या रंगाची गोवंश जातीची गाय २० हजार रुपये किमतीची असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Cow
Navi Sangvi Flood Problem: नवी सांगवीत ‘स्मार्ट’ विकासाचा फटका; अरुंद नाल्यामुळे दरवर्षी सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी

वाहनामुळे उघडले 'कुर्ला कनेक्शन'

सीसीटीव्हीतील रिट्झ कारचा माग काढल्यानंतर ती मुंबईतील कुर्ला परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने वाहनाशी संबंधित माहिती मिळवत एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून साथीदारांचा शोध, चोरीस गेलेल्या गायीची विल्हेवाट आणि यापूर्वी केलेल्या तत्सम गुन्ह्यांबाबत चौकशी सुरू आहे.

Cow
Lonavala Flood Protest: लोणावळ्यात टाटा कंपनीविरोधात जनआक्रोश; पूरनुकसानीच्या भरपाईसाठी मुंबई-पुणे महामार्ग दीड तास रोखला

सराईत टोळीचा संशय

गुंगीचे इंजेक्शन आणि गुंगीकारक द्रव्याचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करण्यात आल्याने ही सराईत आंतरजिल्हा टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. या टोळीचा इतर जिल्ह्यांतील गायचोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक रुपाली बोबडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news