Navi Sangvi Flood Problem: नवी सांगवीत ‘स्मार्ट’ विकासाचा फटका; अरुंद नाल्यामुळे दरवर्षी सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी

माहेश्वरी चौक ते साई चौक परिसरातील नियोजनशून्य कामांवर नागरिकांचा संताप; नाला रुंदीकरण आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
Navi Sangvi Flood
Navi Sangvi FloodPudhari
Published on
Updated on

​सांगवी: विकासाच्या आकर्षक घोषणा आणि ''स्मार्ट सिटी''च्या वल्गना करणाऱ्या यंत्रणेचा खरा चेहरा नवी सांगवीत उघडा पडला आहे. प्रभाग क्रमांक ३२ मधील माहेश्वरी चौक ते साई चौक या परिसरामध्ये प्रशासनाकडून सौंदर्यीकरणाचा बडेजाव मिरवत नाल्याच्या पात्रात विकासकामे राबवण्यात आली. मात्र, अयोग्य जलवाहिन्या आणि नियोजनशून्य सुशोभीकरणामुळे या नैसर्गिक नाल्याचा श्वास कोंडला गेला असून, त्याचे पात्र कमालीचे अरुंद झाले आहे.

Navi Sangvi Flood
Lonavala Flood Protest: लोणावळ्यात टाटा कंपनीविरोधात जनआक्रोश; पूरनुकसानीच्या भरपाईसाठी मुंबई-पुणे महामार्ग दीड तास रोखला

याचा थेट परिणाम पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहू लागताच पाण्याचा विसर्ग पुढे होण्याऐवजी प्रथम तो या अरुंद नाल्यात शिरतो आणि काही क्षणातच आजूबाजूच्या रहिवासी सोसायट्यांमध्ये थैमान घालतो. यामुळे नागरिकांना दरवर्षी याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य स्मार्ट कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. आता तरी प्रशासन या नाल्यांवरील अतिक्रमण हटवून नागरिकांची या समस्येतून सुटका करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

Navi Sangvi Flood
Moshi Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटना: फायर एनओसी देणारे अधिकारी निलंबित; ९ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कारवाईचा बडगा

रहिवाशांचे आर्थिक नुकसान

दरवर्षी पावसाळ्यात चौकाचौकांत तसेच घरांच्या आतील भागात चार ते पाच फूट पाणी साचत असल्याने स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत होते. घरातील महत्त्वाची कागदपत्रे, महागडे फर्निचर तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे पाण्यात नष्ट झाल्यामुळे प्रत्येक कुटुंबाला साधारणपणे एक लाखापर्यंतचा फटका सहन करावा लागतो. या सततच्या भीतीच्या वातावरणाने नागरिकांची मानसिक स्थिती बिघडली आहे. ​या पावसाच्या पुरामुळे नवी सांगवीतील शिवमाज पार्क, इंडलस सोसायटी, द्वारका सोसायटी, मिकल होम्स, अंकुर सोसायटी, स्वस्तिश्री अपार्टमेंट आणि कुणाई सोसायटी या सोसायट्यांना मोठा फटका बसला होता. पुराच्या पाण्यामुळे साचणारे सांडपाणी, दुर्गंधी आणि सततच्या त्रासामुळे कुटुंबियांना वारंवार घरे खाली करून सुरक्षित ठिकाणी जावे लागल्याचे भीषण वास्तव विशाल दगडू वलावंडे (शॉप नं. ०८, स्वस्तिश्री अपार्टमेंट, साई चौक, नवी सांगवी) आणि नितीन सुरवसे (फ्लॅट क्र. २, कृष्णाई नगरी, साई चौक, नवी सांगवी) यांनी मांडले; प्रशासनाचे प्रतिनिधी केवळ देखावा करतात, प्रत्यक्षात ओढ्यातील गाळ व कचरा काढला जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Navi Sangvi Flood
Pimpri Chinchwad Water Cut: पवना धरण १०० टक्के भरले तरी पिंपरी-चिंचवडची पाणीकपात कायम; ऑक्टोबरपर्यंत निर्णय लांबणीवर

चुकीचा आराखडा, बदललेला प्रवाह

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या कृत्रिम संकटामागे स्थानिक यंत्रणेचे सदोष नियोजन कारणीभूत आहे. मूळ नियमांनुसार या नाल्याचा ओघ नदीच्या दिशेने वाहणे आवश्यक होते, परंतु प्रत्यक्षात तो पूर्णपणे उलट दिशेने फिरवण्यात आला आहे. यामुळे नदीचे फुगलेले पाणी सुरळीतपणे पुढे मार्गक्रमण करण्याऐवजी थेट वसाहतींच्या दिशेने उसळी मारते. दरवर्षी पूर आला की हीच परिस्थिती या सोसायट्यांमध्ये असते, यावरती तोडगाच निघत नाही. परिणामी, शिवमाज पार्क, इंडलस सोसायटी, द्वारका सोसायटी, मिकल होम्स, अंकुर सोसायटी, स्वस्तिश्री अपार्टमेंट आणि कुणाई सोसायटी या प्रमुख गृहनिर्माण संस्थांना दरवर्षी या ढिसाळ अभियांत्रिकी कारभाराचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

पावसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा पुराचा धोका!

सध्या धरणांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा भरलेला असून, नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह आणि विसर्ग सतत सुरू आहे. अशा परिस्थितीत अजून दोन ते तीन दिवस जर अशीच स्थिती कायम राहिली, तर सांगवीकरांना पुन्हा एकदा भीषण पुराला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे. आणि जर तसे झाले, तर मागील वेळेप्रमाणेच हे पुराचे पाणी पुन्हा एकदा थेट सोसायट्यांच्या घरात आणि वसाहतींमध्ये घुसून मोठे संकट निर्माण करू शकते, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Navi Sangvi Flood
Pune Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला हिरवा कंदील; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता

​नागरिकांच्‍या मागण्या

  • या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना कर

  • दुर्घटनाग्रस्त भागाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पुरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जावा.

  • चुकीच्या पद्धतीने उभी केलेली बांधकांबे आणि अडथळे ताबडतोब हटवून नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करावे.

सध्या या प्रकरणाचे सर्वेक्षण व पाहणी करण्याचे काम सुरू आहे. योग्य तो अहवाल तयार करून त्यानुसार लवकरच आवश्यक त्या सुधारणात्मक उपाययोजना अमलात आणल्या जातील. नाल्याची रचना बदलल्यामुळे निर्माण झालेल्या या समस्येचे निवारण करण्यासाठी अहिल्यादेवी घाटाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.

प्रशांत कोतकर, उपअभियंता, ह क्षेत्रीय कार्यालय, पिं.चिं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news