Pimpri Chinchwad PCOS Cases: पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांच्या आरोग्याचा इशारा! ४० टक्के महिला-तरुणी पीसीओएसच्या विळख्यात

बदलती जीवनशैली, फास्टफूड आणि ताणतणावामुळे १८ ते ३० वयोगटात धोका वाढला; अनियमित मासिक पाळीपासून वंध्यत्वापर्यंत समस्या
Women Health
Women HealthPudhari
Published on
Updated on

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी: बदलत्या जीवनशैलीचा परिणाम प्रत्येक वयोगटातील महिलांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे महिलांसह तरुणींमध्ये पीसीओडीएसचा धोका वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ४० टक्के महिला व तरुणी पीसीओएसने (पॉलिसिस्टिक ओव्हरिज सिंड्रोम) त्रस्त असल्याचे समोर आले आहे. १८ ते ३० वयोगटातील मुली, महिलांमध्ये हे प्रमाण आधिक असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Women Health
Pimpri Chinchwad Voter Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार पडताळणीला वेग; २९ जुलैपूर्वी फॉर्म न भरल्यास प्रारूप यादीत नाव येणार नाही

बैठी जीवनशैली, अनियमित व चुकीच्या आहाराच्या सवयी, वाढलेला ताणतणाव, व्यायामाचा अभाव, हार्मोन्समध्ये झालेला बदल आणि अनुवंशिकता अशा विविध कारणांमुळे युवतींमध्ये अनियमित मासिक पाळीच्या समस्येत वाढ झाली आहे. यामुळे स्थूलत्व, ओव्होलेशनवर परिणाम झाल्याने लवकर गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, गरोदरपणात मधुमेह समस्येचा त्रास होणे यासारख्या समस्या उदभवतात.

Women Health
Pimpri Chinchwad Waste Management: पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा प्रक्रिया केंद्रांना रहिवाशांचा विरोध; १० केंद्रांचे नियोजन अडचणीत

शहरात पीसीओडीसह पीसीओएसग्रस्त युवतींचे प्रमाणही वाढल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. या आजाराने त्रस्त महिलांना वंध्यत्व, हायपरलिडिमिया, हृदयविकार तसेच हायपरटेन्शन हे विकार होण्याचा धोका असतो. पीसीओएसने ग्रासलेल्या स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा दर जास्त असतो. कारण, त्यामुळे अनियमित ओव्हलेशन होते किंवा होत नाही.

१८ ते ३० वयोगटातील मुलींमध्ये पीसीओडीचे वाढते प्रमाण

पीसीओएसने त्रस्त असलेल्या महिला व मुलींमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठया प्रमाणात उदभवते. नोकरीमुळे अनेक महिलांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेक महिला बाहेरील तेलकट अन्न किंवा फास्टफूड खातात. १८ ते ३० वयोगटातील युवतींच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल झाले. यामुळे पीसीओडीसह पीसीओएसचीही समस्या वाढत आहे.

Women Health
Pimpri Chinchwad Water Cut Continues: पवना धरण ७७ टक्के भरले, तरी पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार!

पीसीओडी म्हणजे काय

पीसीओडी आजार ही एक हार्मोनल समस्या आहे. संप्रेरकांच्या असंतुलानामुळे म्हणजेच हार्मोनल इमबॅलन्समुळे महिलांच्या अंडाशयात लहान-लहान आकारांच्या गाठी तयार होतात. ज्यामुळे महिलांना अनियमित मासिक पाळीचा त्रास होतो आणि गर्भधारणेमध्ये समस्या उद‌्भवतात.

पूर्वीपेक्षा महिलांमध्ये पीसीओडीचे प्रमाण वाढलेले असून, ते ४० टक्क्यांवर पोहचले आहे. महिलांपेक्षा १८ ते ३० वयोगटातील मुलींमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. बदलेली जीवनशैली व्यायामाचा अभाव, फास्टफूडमुळे वाढत्या वजनाच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे डायबिटीजचा धोका वाढू शकतो.

डॉ महेश आसलकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख स्त्रीरोग व प्रसूती विभाग, वायसीएम

Women Health
PCMC PMPML Bus Stop Condition: महापालिका भवनासमोरील पीएमपी बसथांब्यांची दुरवस्था; गवत, धूळ आणि तुटलेल्या साहित्यामुळे प्रवासी त्रस्त

आहारात बदल (कमी कॅलरीयुक्त आहार, उच्च प्रथिनयुक्त आहार, तंतुमय पदार्थयुक्त आहार), नियमित व्यायाम, सकाळी आणि संध्याकाळी ४५ मिनिटे वेगाने चालणे, ६-८ तासांची शांत झोपणे गरजेचे आहे. ध्यानाने ताणतणाव कमी करा, लठ्ठपणा असल्यास वजन कमी करा.

श्रीराज कटकधोंड , स्त्ररोगतज्ज्ञ.

महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कामाच्या वाढत्या ताणामुळे अनेक महिला वेळेवर जेवण करत नाहीत. विद्यार्थींनीदेखील वाढत्या अभ्यासाच्या ताणामुळे आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. पीसीओडीचा त्रास वाढू लागला की मग ताे मोठ्या प्रमाणात वाढत जातो.

तेजस्वीनी सदाशिव, तरुणी

माझे वय ३५ वर्ष आहे. वाढत्या कामात स्वतः कडे लक्ष न दिल्याने मला मासिक पाळीचा त्रास होतो. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे सर्वांत आधी लक्ष द्यावे.

माया कांबळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news