Illegal Hoardings PCMC: अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर लावणाऱ्यांनो सावधान! पिंपरी-चिंचवडमध्ये ९ महिन्यांत १.२१ लाख जाहिरातींवर कारवाई

महापालिकेने १३.३७ लाखांचा दंड वसूल केला; तीन गुन्हे दाखल, पुन्हा अनधिकृत जाहिराती केल्यास कठोर कारवाईचा इशारा
Illegal Hoardings PCMC
Illegal Hoardings PCMCPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर, किऑस्क लावून विद्रुपीकरण करणार्‍यांवर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2026 या नऊ महिन्यांत तब्बल 1 लाख 21 हजार 216 अनधिकृत जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर, किऑस्कवर कारवाई केली आहे.

तसेच, नागरिक आणि व्यावसायिकांकडून 13 लाख 37 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला असून, तीन गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही अनधिकृतपणे जाहिराती करणार्‍यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी दिला आहे.

Illegal Hoardings PCMC
PCMC Modified Silencers | ‘बुलेट राजां’ना वाहतूक पोलिसांचा दणका: सांगवीत ४१५ सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर

शहरात सुमारे 1 हजार 600 पेक्षा अधिक अधिकृत जाहिरात होर्डिंग आहेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणी लग्न, वाढदिवस, स्वागत, निवडणूक, धार्मिक व अन्य कार्यक्रमांचे फ्लेक्स व फलक लावले जातात. यामुळे शहर विद्रुप होत असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

त्यामुळे अशा प्रकारच्या फ्लेक्स, होर्डिंग, किऑक्स व फलकांवर दहाही क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकांकडून कारवाई केली जात आहे. त्याबाबत सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व शहराध्यक्षांनाही सूचित करण्यात आले आहे.

Illegal Hoardings PCMC
Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवडकरांना पाणीटंचाईची चिंता; १६ ऑक्टोबरपासून आणखी १० टक्के पाणीकपात

मात्र, त्यानंतरही शहरातील विविध भागात अनधिकृत जाहिराती लावल्या जात आहेत. आगामी काळात नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी असे सण व उत्सव आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, विविध संस्था, संघटना अनधिकृतपणे जाहिरात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.

महापालिकेकडून तीन गुन्हे दाखल

आकाश चिन्ह व परवाना विभागाने 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दहाही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अतिक्रमण पथकाने अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्सवर कारवाईसाठी मोहीम राबविली. त्याअंतर्गत 1 लाख 21 हजार 216 अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्सवर कारवाई करून ते जप्त करण्यात आले आहेत.

शहर विद्रुप करणार्‍या व्यावसायिक, नागरिकांकडून 13 लाख 37 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहर विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आगामी काळात सण, उत्सव आहेत. त्यामुळे नागरिक, संस्था, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी शहरातील कोणत्याही भागात बेकायदेशीर होर्डिंग, फलक, पोस्टर्स, बॅनर, फ्लेक्स किंवा किऑस्क लावून शहर विद्रुप करू नये. महापालिकेने परवानगी दिलेल्या अधिकृत होर्डिंग्जवर जाहिरात लावावी. बेकायदेशीर जाहिरातबाजी केल्यास दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.

- राजेश आगळे, उपायुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news