Pimpri Chinchwad Sports Committee: पिंपरी-चिंचवड क्रीडा समितीचे वर्षभराच्या उपक्रमांचे नियोजन; खेळाडूंसाठी वसतिगृह प्रस्ताव

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमची मागणी; आण्णासाहेब मगर स्टेडियमच्या कामांना गती देण्यावर भर
Pimpri Chinchwad Sports Committee
Pimpri Chinchwad Sports CommitteePudhari
Published on
Updated on

पिंपरी: क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे कामकाज अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक करण्यासाठी समितीच्या वर्षभराच्या उपक्रमांचे आगाऊ नियोजन करण्यात येईल. समितीच्या सर्व उपक्रम किंवा कार्यक्रमांसाठी एक सर्वसमावेशक धोरण तयार केले जाईल. त्या आधारे आगामी काळात समितीचे कामकाज आणि विविध कार्यक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे यांनी दिली.

Pimpri Chinchwad Sports Committee
Pimpri Vegetable Market Prices: पिंपरी भाजी मंडईत दर स्थिर; बाजारात तोतापुरी कैरीची एंट्री, लिंबू महाग

क्रीडा समितीची बैठक कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विरोधी पक्षनेते तथा समितीचे सदस्य भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे, प्रमोद कुटे, नगरसचिव मुकेश कोळप, उपायुक्त पंकज पाटील, चेतना केरूरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Sports Committee
Pimpri Chinchwad Property Tax: पीसीएमसीचा मालमत्ताकर 800 कोटींच्या पुढे; अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत

समितीच्या सर्व उपक्रमांसाठी एक स्वतंत्र धोरण निश्चित करण्यात येणार असून, त्या धोरणाच्या आधारे सर्व सदस्यांच्या सहभागातून विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहरात विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी अनेक खेळाडू येत असतात. मात्र, त्यांच्या निवासाची योग्य सोय नसल्याची बाब लक्षात घेऊन खेळाडूंसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही बैठकीत व्यक्त करण्यात आली.

Pimpri Chinchwad Sports Committee
Clay Pot Demand Summer: उन्हाचा कडाका वाढताच पिंपरीत माठांना मागणी

नेहरूनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियमच्या प्रलंबित कामांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही विशेष भर देण्यात आला. महापालिकेच्या सर्व शाळांमधील मैदाने सुटीच्या दिवशी मुलांसाठी खेळण्यासाठी खुली करण्याबाबत सूचनाही करण्यात आली. शहरात विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकांची कमतरता आहे. विविध क्रीडा संकुल व मैदाने येथे सुरक्षारक्षकांची कमतरता असल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण आहे. आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

नाट्यगृहात स्थानिक कलाकारांचे छायाचित्रे लावा

शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. नाट्यगृहांमध्ये इतर ठिकाणच्या कलाकारांच्या छायाचित्रांऐवजी शहरातील स्थानिक कलाकार, कलावंत आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींची छायाचित्रे लावावीत, अशी सूचना करण्यात आली.

Pimpri Chinchwad Sports Committee
PCMC EV Charging Station Project: पिंपरी-चिंचवडमध्ये ई-चार्जिंग स्टेशन प्रकल्प रखडला

जलतरण तलावांमधील पाणी स्वच्छ ठेवा

शहरातील महापालिकेचे सर्व जलतरण तलावांमधील पाण्याची गुणवत्ता राखणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक तलावातील पाण्यातील क्लोरीनची पातळी नियमित तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना त्याबाबत माहिती मिळावी यासाठी संबंधित जलतरण तलावांवर सूचनाफलक लावण्याचे निर्देश समितीतर्फे देण्यात आले.

यमुनानगर, मोहननगर तलाव तीन वर्षांसाठी भाडे तत्वावर

यमुनानगर येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे जलतरण तलाव आणि मोहननगर येथील छत्रपती राजश्री शाहू महाराज जलतरण तलाव 3 वर्षांसाठी भाडे तत्वावर चालविण्यास क्रीडा समितीने मान्यता दिलीा तो ठराव स्थायी समितीसमोर सादर करण्यासाठी मंजूरी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news