

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. 15) बाजारात फळभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. बाजरात तोतापुरी कैरीची आवक झाली आहे. उन्हामुळे लिंबूचे दर वाढले आहे. इतर फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये स्थिर होते.
तोतापुरी कैरी बाजरात 100 रूपये किलो होती. तर लिंबू 120 रूपये किलो होते. वाटाणा गाजर यांचे दर नेहमीप्रमाणे 30 ते 40 रूपये होते. बाजारात गवारीची आवक कमी झाली आहे. बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक यांचे दर 20 रूपये प्रति जुडी होते. कांदे 100 रूपयांना पाच किलोने विक्री केली जात आहे. लसूण 100 - 150 रूपये तर आले 60 - 80 रूपये किलो दराने उपलब्ध होते.
फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
गवार 120 रूपये किलो, शेवगा 90, वाटाणा 30, टोमॅटो 25, भेंडी 60, फ्लॉवर 30, कोबी 30, मिरची 80 - 100, गाजर 30, शिमला 60, लसूण 100 - 150, आले 60, वांगी 80, काकडी 30, कारले 70, बटाटा 25- 30, बिन्स 70, पावटा 60, भोपळा 30, दोडका 70, तोंडली 50 रूपये, बीट 30, दुधी 50, घेवडा 60.
पिंपरी बाजारातील दर पाले भाज्यांचे दर (रुपये) प्रतिजुडी:
कोथिंबीर 20 रुपये, मेथी 20, पालक 20, शेपू 20, राजगिरा 20, पुदिना 10, मुळा 20, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 20, करडई 20, आळू पाने 10, चुका 20.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
शेवगा 100 रूपये, गवार 150, पावटा 80, तोंडली 80, वाटाणा 40, बीट 30, दोडका 80, कारली 70, भरताची वांगी 50, भेंडी 80 रुपये, मिरची 80 - 100, फ्लॉवर 30 - 40, कोबी 30, वांगी 60, घोसळे 70, पडवळ 90, दुधी भोपळा 50, पापडी 70, परवल 80, सुरण 80 रुपये, मद्रास काकडी 40 रुपये, आरबी 50 रुपये किलो, सिमला 80 रुपये, राजमा 50 काळा, राजमा लाल 50, बिन्स 80 रुपये, गाजर 40 रुपये किलो, आवळा 60-70, रताळी 80 रुपये, टोमॅटो 30 रुपये, बिन्स 60 रुपये, काकडी 30 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा 12, बटाटा 12, लसूण 70, आले 30, भेंडी 30, गवार 70, टोमॅटो 10, वाटाणा 40, घेवडा 50, दोडका 30, हिरवी मिरची 60, दुधी भोपळा 25, काकडी 15, कारली 30, गाजर 25, फ्लॉवर 10, कोबी 10, वांगी 25, बीट 30, शेवगा 75, घोसाळी 30, लिंबू 100, शिमला 35, परवल 0, मका कणीस 15 रू प्रतिकिलो दर होते.
मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)
फळभाजी 4808, पालेभाजी 57300 (गड्डी), फळे आवक 1679, कांदा 1009, बटाटा 895, आले 38, लसूण 35, भेंडी 86, गवार 30, टोमॅटो 627, वाटाणा 59, घेवडा 78, दोडका 78, हिरवी मिरची 141, दुधी भोपळा 105, काकडी 257, कारली 33, डांगर 28, गाजर 153, फ्लॉवर 356, कोबी 275, वांगी 156, ढोबळी 44, बीट 0, शेवगा 65, कैरी 39, लिंबू 60, मका कणीस 40, तोंडली 0, रताळी 8 क्विंटल आवक झाली आहे.
कलिंगड, खरबूज, पपईला मागणी
उन्हाळ्यामुळे रसदार कलिंगड, खरबूजांना आणि पपईला मागणी वाढली आहे. त्यामुळे पिंपरी फळ बाजारात कलिंगड, खरबूजांची, पपई, द्राक्षांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. वाढत्या उन्हामुळे रसदार कलिंगड आणि खरबुज खाण्याकडे ग््रााहकांचा कल आहे. शुगर बेबी जातीची कलिंगडे गोड असल्याने ग््रााहकांचा खरेदीकडे कल आहे.
फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे:
सफरचंद 150 - 200 रूपये, मोसंबी 150, संत्री 200, डाळिंब 200 - 250, पेरू 100 रूपये, अंजीर 100 रूपये , पपई 50 - 60 रूपये, दाक्षे 160 रूपये, कलिंगड 40 रूपये, केळी 50 - 60 रूपये, खरबूज 60 रूपये, अननस 120 प्रतिनग, पिअर 260 रूपये, ड्रॅगनफुट पांढरे 300 रूपये, लाल ड्रॅगनफुट 400 रूपये, स्ट्रॉबेरी 100 रूपये, किवी 120 - 130,चिकू 50 रूपये किलो.