Pimpri Chinchwad Property Tax: पीसीएमसीचा मालमत्ताकर 800 कोटींच्या पुढे; अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत

विलंब दंडावर 90% सवलत; थकबाकीदारांवर जप्ती व नळजोड तोडण्याची कारवाईचा इशारा
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 14 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 800 कोटी 84 लाख रुपयांचा मालमत्ताकर जमा झाला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, करसंकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, विविध सवलतींची अंमलबजावणी तसेच कर भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन सुविधांमुळे करसंकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. अद्याप मालमत्ताकर न भरलेल्या थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेऊन मालमत्ताकर लवकर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Property Tax
Clay Pot Demand Summer: उन्हाचा कडाका वाढताच पिंपरीत माठांना मागणी

थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ताकराची रक्कम एकरकमी भरल्यास 31 मार्चपर्यंत विलंब दंडाच्या रकमेवर तब्बल 90 टक्के सवलत देण्यात येत आहे. त्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अवघे 17 दिवस शिल्लक राहिले आहेत.

Property Tax
PCMC EV Charging Station Project: पिंपरी-चिंचवडमध्ये ई-चार्जिंग स्टेशन प्रकल्प रखडला

शहरात निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर एकूण 7 लाख 32 हजार मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी 5 लाख 75 हजार 328 मालमत्ताधारकांनी आत्तापर्यंत कराचा भरणा केला आहे. कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येत असून, शहरातील नागरिकांकडून कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर जप्ती तसेच नळजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे.

Property Tax
Dehuroad Firewood Price Rise: गॅस टंचाईचा परिणाम; देहूरोडमध्ये जळाऊ लाकूड 5 रुपयांनी महाग

कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन

शहरातील नागरिकांनी मालमत्ताकर वेळेत भरून महापालिकेच्या विकासकामांना मोठा हातभार लावला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि करसंकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, यामुळे 800 कोटींहून अधिक करसंकलन शक्य झाले आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांनीही अभय योजनेचा लाभ घेऊन थकीत कराची रक्कम भरावी, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

31 मार्चपर्यंत कर न भरल्यास जप्ती

अभय योजनेअंतर्गत विलंब दंडावर 90 टक्के सवलत दिल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. ज्यांनी अद्याप मालमत्ताकर भरलेला नाही त्यांनी 31 मार्च 2026 पूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा; अन्यथा नियमानुसार जप्ती व नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

Property Tax
Gas Shortage Chulha Cooking: गॅस टंचाईच्या अफवा; गावाकडे पुन्हा चुलीवर स्वयंपाक

विभागीय कार्यालयांतर्गत महसूल करसंकलन विभागाची 1 एप्रिल 2025 पासून ते 13 मार्च 2026 या कालावधीतील वसुली

  • वाकड : 101 कोटी 21 लाख रुपये

  • थेरगाव : 80 कोटी 56 लाख

  • चिखली : 66 कोटी 54 लाख

  • किवळे : 55 कोटी 46 लाख

  • कस्पटेवस्ती : 52 कोटी 37 लाख

  • भोसरी : 51 कोटी 85 लाख

  • चिंचवड : 50 कोटी 74 लाख

  • मोशी : 50 कोटी 34 लाख

  • पिंपरी वाघेरे : 45 कोटी 64 लाख

  • सांगवी : 40 कोटी 15 लाख

  • पालिका भवन : 37 कोटी 11 लाख

  • आकुर्डी : 36 कोटी 9 लाख

  • चऱ्होली : 31 कोटी 61 लाख

  • फुगेवाडी-दापोडी : 30 कोटी 83 लाख

  • दिघी-बोपखेल : 24 कोटी 9 लाख

  • तळवडे : 21 कोटी 9 लाख

  • निगडी-प्राधिकरण : 17 कोटी 99 लाख

  • पिंपरी कॅम्प : 7 कोटी 17 लाख रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news