Pimpri Chinchwad Sant Tukaram Maharaj Palkhi: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अभंगरंग’चा भक्तिसोहळा; संत तुकाराम महाराजांच्या पालखीवर दै. ‘पुढारी’तर्फे स्वराभिषेक

गायक अभिषेक काळेंच्या अभंगांनी निगडी परिसर दुमदुमला; वारकऱ्यांनी फुगडी, रिंगण सोहळ्यात घेतला भक्तिरसाचा आनंद
Sant Tukaram Maharaj Palkhi
Sant Tukaram Maharaj PalkhiPudhari
Published on
Updated on

पिंपरी: 'जय जय रामकृष्ण हरी', 'समाधी साधन संजीवन नाम', 'राजस सुकुमार मदनाचा पुतळा', 'विठ्ठल विठ्ठल नामचिये गजरी', अशा एकापेक्षा एक सरस अभंगांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यावर दै. पुढारीतर्फे गायक अभिषेक काळे यांच्या गायनाने स्वराभिषेक करण्यात आला. निमित्त होते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील आगमनाचे.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Patan Village Theft: दरडीच्या संकटानंतर पाटण गावावर चोरीचे संकट; २० घरांची कुलपे तोडून लाखोंचा ऐवज लंपास

राजाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांचा भक्तीमय पालखी सोहळा उद्योगनगरीमध्ये बुधवार (दि. ८) रोजी सायंकाळी दाखल झाला. या भक्ती सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दैनिक पुढारी प्रस्तुत 'अभंगरंग आनंदाचे डोही, आनंद तरंग' ही भक्तिरसाची मेजवानी वारकऱ्यांना मिळाली.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Moshi Building collapse: मोठी दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली; 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

निगडी येथील मधुकर पवळे पूल याठिकाणी दुपारी चार वाजता संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिषेक काळे यांनी 'अभंगरंग' हा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी आमदार शंकर जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक विकास साने, वाहतूक विभाग उपायुक्त विक्रांत देशमुख, बहुजन कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, दै. पुढारीचे निवासी संपादक सुनील माळी, सरव्यवस्थापक सुनील लोंढे, पिंपरी-चिंचवड आवृत्ती प्रमुख किरण जोशी आदी उपस्थित होते. पालखी सोहळा आगमनानिमित्त स्वागत सोहळ्याप्रसंगी निगडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ‘अभंग रंग’ या उपक्रमामुळे संपूर्ण चौक वारकरी संप्रदायाच्या रंगात रंगला होता.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Pimpri Flood Rescue: पिंपरी-चिंचवडमध्ये पूरस्थिती; 1,500 नागरिक, 750 जनावरांची सुखरूप सुटका

अभंग रंगात रंगला रिंगण सोहळा

दै. पुढारीतर्फे आयोजित 'अभंग रंग' हा कार्यक्रम सुरू असताना उपस्थित वारकऱ्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली. वारकऱ्यांनी अभंग रंगात रंगत फुगड्या आणि रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. या रिंगण सोहळ्यामध्ये सर्व अबालवृद्ध सहभागी झाले होते. फुगड्या टाळ्यांचा गजर यांनी आणि हरिनामाचा जयघोष यामुळे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. भर पावसातही वारकऱ्यांच्या जोडीला शहरवासीयही एकत्र येऊन या रिंगण सोहळ्यात सहभागी झाले. यामध्ये वारकरी प्रभाकर घोटमले यांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले.

Sant Tukaram Maharaj Palkhi
Pimpri Chinchwad Palkhi Traffic: पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज! 2 हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, 45 रस्त्यांवर वाहतुकीत बदल

विठ्ठल-रुक्मिणी वेशातील बालवारकरी

अभंगरंग कार्यक्रमाच्या शेवटी विराग वाकचौरे यांने विठ्ठलाची वेशभूषा आणि आज्ञा ढवळे हिने रुक्मिणीची केलेली वेशभेषा आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरली. विठ्ठलाच्या वेशभूषेतील विराग याने वारीमध्ये ‘झाडे लावा’ हा पर्यावरणाचा संदेश दिला.

‘दै. पुढारीकडून संस्कृती जागरचे काम’

या वेळी आमदार शंकर जगताप म्हणाले की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जमलेल्या सर्व वैष्णवांचे मी सहर्ष स्वागत करतो. एक अनोख्या प्रकारचे स्वागत आज दै. पुढारी आणि त्यांच्या टीमने केले. त्यांचे मी मनापासून कौतुक करतो व अभिनंदन करतो. संस्कृतीचा जागर करण्याचे काम त्यांनी केले. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीदेखील दै. पुढारीच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. तसेच सर्व वारकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news