Pimpri Chinchwad RTO Server Issue: पिंपरी-चिंचवड आरटीओचा सर्व्हर वारंवार ठप्प; वाहनधारकांची कामे रखडली, नागरिक त्रस्त

परवाना, वाहन नोंदणी, करभरणा आणि ऑनलाइन सेवांमध्ये अडथळे; तासन्तास प्रतीक्षा करूनही कामे अपूर्ण
Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad RTOPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील ऑनलाइन सेवा देणारा सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने वाहनधारक, चालक आणि विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांची गैरसुविधा होत आहे.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Zoo Closed: 20 कोटी खर्चूनही पिंपरीतील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय बंदच; दहा वर्षांपासून नागरिकांची प्रतीक्षा कायम

शिकाऊ तसेच कायमस्वरूपी वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी, करभरणा, दंडाची रक्कम जमा करणे, मालकी हस्तांतरण तसेच इतर ऑनलाइन सेवांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने कार्यालयातील कामकाज संथ गतीने सुरू आहे.

Pimpri Chinchwad RTO
PMRDA Manpower Shortage: पीएमआरडीएत मनुष्यबळाचा तुटवडा; ६१ टक्के पदे रिक्त, विकासकामांच्या गतीवर परिणाम

दररोज शेकडो नागरिक वाहनविषयक कामांसाठी पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात येत असतात. मात्र, सर्व्हर सतत बंद पडत असल्याने ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

Pimpri Chinchwad RTO
Morwadi Court Pimpri Chinchwad: मोरवाडी न्यायालयात न्यायाधीश वाढले; पण सुविधांचा अभाव कायम, पक्षकारांचे हाल सुरूच

अनेकांना काम न झाल्याने पुन्हा कार्यालयात यावे लागत असून वेळ आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. विशेषतः कामानिमित्त रजा घेऊन आलेल्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Pimpri Chinchwad RTO
Kasarwadi Underpass Damage: पूर ओसरला, पण संकट कायम! कासारवाडीतील शंकरवाडी भुयारी मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात

सर्व्हरच्या समस्येमुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनाही कामकाज करताना समस्या निर्माण होत आहे. ऑनलाइन प्रणालीवर आधारित बहुतांश सेवा ठप्प झाल्याने अर्जांची प्रलंबित संख्या वाढत आहे. नागरिकांकडून वारंवार चौकशी होत असल्याने कर्मचार्‍यांनाही रोषाचा सामना करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news