PCMC Stray Dog Vaccination: पिंपरी-चिंचवडमध्ये रेबीज लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह; प्राणीप्रेमींचे आरोप

वैज्ञानिक नियमांकडे दुर्लक्ष, अपूर्ण नोंदी आणि डेटा अभावामुळे मोहिमेवर टीका; प्रशासनाकडून कराराचे समर्थन
Dog Vaccination
Dog VaccinationPudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी: महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने डब्लूव्हीएस होप मिशन रेबीज या संस्थेसोबत रेबीज नियंत्रणासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. मात्र, या लसीकरण मोहीम वैज्ञानिक नियमांऐवजी अप्रमाणित पद्धतीने राबवली जात असल्याचा आरोप प्राणीप्रेमींकडून केला जात आहे. भटक्या श्वानांना लस देण्यात आली; पण ती कोणत्या भागात दिली, त्याचा डेटा, लसीकरणाची आकडेवारी याबाबत कोणतीही माहिती पशुवैद्यकीय विभागाकडे नाही.

Dog Vaccination
Pimpri Chinchwad Census 2027: पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना 2027 सुरू; हलगर्जीपणावर कारवाईचा इशारा

आजारी श्वानांचेही लसीकरण

पशुवैद्यकीय नियमांनुसार लसीकरणापूर्वी श्वानांच्या शरीराचे तापमान मोजणे, आरोग्य स्थिती तपासणे आणि वैद्यकीय मूल्यांकन करणे अनिवार्य आहे. मात्र, ही मूलभूत प्रक्रिया पूर्णपणे टाळली जाते. आजारी किंवा ताप असलेल्या प्राण्यांना दिलेली लस प्रभावी ठरत नाही, कारण अशावेळी शरीरात आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. परिणामी, लसीकरण झाल्याचे दाखवले तरी ते प्राणी रेबीजपासून संरक्षित नसतात आणि संसर्ग पसरवण्याची शक्यता कायम राहते, असा दावा प्राणीमित्र करत आहेत.

Dog Vaccination
PCMC E Pass System: पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रवेशासाठी ‘स्वागतम ई पास’ अनिवार्य

चुकीच्या लसीकरणामुळे सुरक्षिततेला धोका

लसीकरण केल्यामुळे नागरिकांना परिसरातील श्वान सुरक्षित असल्याचा विश्वास दिला जातो; पण ही सुरक्षितता वैज्ञानिकदृष्ट्‌‍या सिद्ध नाही. रेबीजची लक्षणे दिसल्यानंतर जवळपास 100 टक्के मृत्यूदर असतो. अशा लसीकरणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर अनैतिक वर्तन मानले जाऊ शकते.

लसीकरणानंतर डोक्यावर लाल रंगाची खूण

डब्लूव्हीएस होप या संस्थेकडे श्वानांच्या लसीकरणाचे काम दिले आहे. ही संस्था लसीकरण झालेल्या श्वानांना व तीन महिन्यांच्या पुढील पिल्लांच्या डोक्यावर लाल रंगाची खूण (टीळा) लावते. ही खूण पंधरा दिवस राहते. संस्थेने आतापर्यंत 16 हजार 452 श्वानांचे लसीकरण केले असल्याचे सांगितले जाते.

Dog Vaccination
Lawrence Bishnoi Gang Sleeper Cell: लॉरेन्स बिष्णोई गँगचे ‘स्लीपर सेल’ सक्रिय; पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान

नोव्हेंबर 2025 मध्ये संस्थेला लसीकरणाचे काम दिले आहे. किती लसीकरण केले, याचा डेटा आमच्याकडे नाही. ज्या संस्थेला काम दिले आहे त्यांच्याकडून घ्यावा लागेल. आमचा व्हॉट्‌‍स ॲप ग््रुाप आहे, त्यावर किती लसीकरण केले याची माहिती दिली जाते; पण अशी एकत्रित माहिती आमच्याकडे नाही.

डॉ. अरुण दगडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका

श्वानांना पकडणे हे खूप आव्हानात्मक काम असल्याने त्याला पकडून त्याची तपासणी करता येत नाही. श्वान पकडण्याच्या टीममध्ये चार कर्मचारी असतात आणि एक प्रशिक्षित कर्मचारी त्याचे लसीकरण करतो. आतापर्यंत 16 हजार 452 श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे.

डॉ. सना खान, प्रकल्प अधिकारी, डब्लूव्हीएस होप मिशन रेबीज

Dog Vaccination
Pimpri Chinchwad Crime: चिंचवड बसथांब्यावर तरुणीसमोर अश्लील कृत्य; परिसरात खळबळ

लसीकरण करताना ज्यांना काम दिले आहे, त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची नोंदणी नाही. मुंबई महापालिका श्वानांचे लसीकरण केल्यानंतर त्यांच्या गळ्यात एक बेल्ट घालते. त्यावर कोणत्या तारखेला लसीकरण केले ती तारीख आणि एक्सपायरी डेट मेन्शन असते. अशी कोणतीही पद्धत शहरात अवलंबली जात नाही. त्यामुळे चऱ्होली याठिकाणी एकाच श्वानाचे तीनदा लसीकरण केल्याने ओव्हरडोस होऊन त्याचा मृत्यू झाला होता.

विक्रम भोसले, प्राणीमित्र, रेस्क्यू टीम वनविभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news