Online Booking Scam: द्वारका यात्रेच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक; पिंपरीतील ज्येष्ठ नागरिकाला गंडा

बनावट हॉटेल बुकिंगचा सापळा; सायबर गुन्हेगारांचा नवा डाव, पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन
Online Booking Scam
Online Booking ScamPudhari
Published on
Updated on

पिंपरी: ‌‘ऑनलाईन बुकिंगवर विश्वास ठेवून द्वारका यात्रेसाठी गेलो; मोबाईलवर दाखवलेले हॉटेल पाहून आम्ही निश्चिंत होतो. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचलो तेव्हा समोर पडकी, ओसाड इमारत पाहून पायाखालची जमीनच सरकली. ना रूम, ना बुकिंग फक्त फसवणूक झाल्याचे लक्षात आले,‌’ अशी हळहळ व्यक्त करत पिंपरी-चिंचवडमधील एका ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलिसांकडे आपला अनुभव मांडला. या घटनेमुळे त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला असून धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेल्या डिजिटल फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

Online Booking Scam
RTE Admission Issues: आरटीई प्रवेशात गोंधळ; कागदपत्र पडताळणीसाठी पालकांची फरपट

चिंचवड परिसरातील रहिवासी असलेल्या या ज्येष्ट नागरिकाने द्वारका येथे राहण्यासाठी मोबाईलच्या मदतीने गुगलवर हॉटेलचा शोध घेतला. आकर्षक फोटो, कमी दर आणि ‌‘मर्यादित ऑफर‌’चा दावा पाहून त्यांनी तातडीने ऑनलाईन बुकिंग केले. संबंधित वेबसाइटवर स्वतःला ‌‘अधिकृत एजंट‌’ असल्याचा दावा करण्यात आला होता. काही वेळातच त्यांना फोन व व्हॉट्स ॲपवरून संपर्क साधून बुकिंग कन्फर्म असल्याचे सांगण्यात आले. ‌‘रूम्स लवकर भरत आहेत, लगेच पेमेंट करा‌’ असा दबाव टाकत क्यूआर कोडद्वारे त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले.मात्र, द्वारका येथे पोहोचल्यावर प्रत्यक्षात दिलेल्या पत्त्यावर कोणतेही हॉटेल अस्तित्वात नसल्याचे उघड झाले. चौकशी केली असता ती इमारत बराच काळ बंद व पडकी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकही बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सायबर गुन्हेगारांकडून धार्मिक यात्रांच्या नावाखाली अशाच प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेषतः चारधाम, द्वारका, वाराणसी यांसारख्या तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या यात्रेकरूंना लक्ष्य केले जात आहे.

Online Booking Scam
PCMC Tender Powers Legal Committee: पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तासंघर्ष? निविदा अधिकार विधी समितीकडे

फसवणुकीची ‌‘मोडस ऑपरेंडी‌’

सायबर टोळ्या गुगल सर्च व सोशल मीडियावर बनावट वेबसाइट्स व जाहिराती दाखवतात. या वेबसाइट्स अधिकृत असल्याचा भास निर्माण केला जातो. त्यानंतर ‌‘मर्यादित सीटस्‌‍‌’, ‌‘व्हीआयपी बुकिंग‌’, ‌‘तातडीची उपलब्धता‌’ अशा आमिषांद्वारे ग्राहकांवर दबाव टाकला जातो. काही प्रकरणांमध्ये बनावट एजंट फोन किंवा व्हॉट्स ॲपवरून संपर्क साधून विश्वास संपादन करतात. त्यानंतर आधार, प्रवास तपशील यासारखी वैयक्तिक माहिती घेतली जाते आणि क्यूआर कोड किंवा यूपीआय आयडीवर पेमेंट करून घेतले जाते. पैसे मिळाल्यानंतर बनावट कन्फर्मेशन पाठवले जाते किंवा संपर्क तोडला जातो.

Online Booking Scam
Pimpri Bridge Beautification Controversy: पिंपरी-चिंचवडमध्ये पुलावर उधळपट्टीचा आरोप; सुशोभिकरणावर कोट्यवधींचा खर्च

अधिकृत संकेतस्थळावरच बुकिंग करा

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. GOV.IN डोमेन असलेल्या अधिकृत सरकारी संकेतस्थळावरच नोंदणी करावी. हेलिकॉप्टर किंवा टूर बुकिंगसाठी केवळ अधिकृत व सत्यापित प्लॅटफॉर्मच वापरावेत. सोशल मीडियावरील जाहिराती, अनोळखी लिंक किंवा गुगलवरील पहिल्या रिझल्टवर अंधविश्वास ठेवू नये. कोणत्याही एजंटला पैसे देण्यापूर्वी त्याची पूर्ण पडताळणी करावी, असेही सांगण्यात आले आहे.

Online Booking Scam
Pimpri Fire : तळेगावात एकाच दिवशी चार ठिकाणी आगीचा थरार; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

ज्येेष्ठ नागरिक ठरताहेत सोपे लक्ष्य

डिजिटल व्यवहारातील मर्यादित अनुभव, तांत्रिक बाबींचे अपुरे ज्ञान आणि ‌‘अधिकृत‌’ वाटणाऱ्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती यामुळे जेष्ठ नागरिक सायबर फसवणुकीचे सोपे लक्ष्य ठरत आहेत. तातडीचा दबाव, आकर्षक ऑफर किंवा श्रद्धेशी संबंधित आमिषे दाखवून त्यांची दिशाभूल केली जाते. अनेकदा निर्णय एकट्याने घ्यावा लागणे आणि दुबार पडताळणीसाठी तत्काळ कोणी उपलब्ध नसणे, या कारणांमुळे अशा प्रकारांत जेष्ठ नागरिक अधिक प्रमाणात बळी पडत आहेत.

धार्मिक यात्रांच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे कोणत्याही वेबसाइट किंवा एजंटला पैसे देण्यापूर्वी त्याची शंभर टक्के पडताळणी करणे आवश्यक आहे. गुगलवरील पहिला रिझल्ट नेहमीच अधिकृत असेलच असे नाही. फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

रवीकरण नाळे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news