Pimpri Chinchwad Property Tax: थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्ती कारवाईस गती द्या; महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे करसंकलन विभागास निर्देश

पिंपरी-चिंचवड महापालिकेने १३०० कोटी रुपयांच्या मालमत्ताकर वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. बिगरनिवासी व औद्योगिक मालमत्तांच्या थकबाकीला प्राधान्य देत जप्तीची कारवाई वेगाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Pimpri Chinchwad Property Tax
Pimpri Chinchwad Property TaxPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1 हजार 300 कोटी रुपये मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई करावी. विशेषत: बिगरनिवासी व औद्योगिक मालमत्तांच्या थकबाकी वसुलीला प्राधान्य देत, स्वतंत्र वसुली पथके तयार करून मालमत्ता जप्तीच्या धडक कारवाईस गती द्यावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी करसंकलन विभागास दिले आहेत.

करसंकलन विभागाच्या मालमत्ताकर वसुलीसंदर्भात आढावा बैठक महापालिका भवनात झाली, या वेळी अतिरिक्त आयुक्त सांडभोर बोलत होत्या. बैठकीला उपायुक्त सचिन पवार यांच्यासह करसंकलन विभागाचे प्रशासन अधिकारी, मुख्य कार्यालयातील अधिकारी, सर्व 18 विभागीय करसंकलन कार्यालयातील मंडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Property Tax
Pimpri Chinchwad Ganesh Mandal: शहरातील केवळ १११ गणेशोत्सव मंडळांना परवाना

अतिरिक्त आयुक्त सांडभोर म्हणाल्या, की ज्या मालमत्ताधारकांना मालमत्ताकराची बिले दिली आहेत. मात्र, अद्याप कराचा भरणा करण्यात आलेला नाही, अशा मालमत्तांची स्वतंत्रपणे नोंद करावी. संबंधित मालमत्ताधारकांशी संपर्क साधून कर भरण्याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच, थकबाकी वसुलीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. ३० सप्टेंबरपर्यंत कर वसुलीच्या मोहिमेला विशेष गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र, मोकळ्या जागा तसेच, इतर मालमत्ताधारकांची यादी तयार करावी. तसेच, ज्या मालमत्ताधारकांकडे मालमत्ताकराची थकबाकी आहे, त्यांना 30 सप्टेंबरपूर्वी नोटिसा बजावून 1 ऑक्टोबरपासून जप्तीची कारवाई सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक विभागीय कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील मालमत्ताकर वसुलीचे सूक्ष्म नियोजन करावे. कोणत्या प्रकारच्या मालमत्तांकडून किती थकबाकी आहे, कोणत्या मालमत्ताधारकांना बिले बजावण्यात आली आहेत. अद्याप भरणा झालेला नाही, याची माहिती अद्ययावत ठेवून त्यानुसार वसुलीची कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pimpri Chinchwad Property Tax
Dehu Road Eco Friendly Ganesh Idols: देहूरोडमध्ये ‘लाल मातीचा बाप्पा’! पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना भक्तांची पसंती

सव्वापाच महिन्यांत 584 कोटी 49 लाख रुपयांचा भरणा

महापालिकेने चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठी मालमत्ता करवसुलीचे 1 हजार 300 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. एक एप्रिल 2026 ते 10 सप्टेंबरपर्यंत म्हणजे सव्वापाच महिन्यांत 584 कोटी 49 लाख 45 हजार 228 रुपयांचा मालमत्ताकर भरणा झाला आहे. मालमत्ताकर वेळेत भरणार्‍या नागरिकांसाठी सवलत योजना लागू करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ताकर ऑनलाइन भरल्यास सामान्यकरावर 4 टक्के सवलत आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे 20 दिवस शिल्लक आहेत. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ताकराचा भरणा केलेला नाही, त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ऑनलाइन पद्धतीने कराचा भरणा करावा आणि 4 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news