Pimpri Chinchwad Property Tax Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर वसुलीचा विक्रम! दोन महिन्यांत 230 कोटींचा महसूल जमा

ऑनलाइन कर भरण्याकडे नागरिकांचा मोठा कल; 10% सवलतीचा लाभ घेत हजारो नागरिकांनी डिजिटल माध्यमातून भरला कर
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पिंपरी: महापालिकेच्या करसंकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 26 मे 2026 या दोन महिन्यांच्या कालावधीत 230 कोटींहून अधिक मालमत्ताकर जमा झाला आहे. आतापर्यंत शहरातील 2 लाख 32 हजार 385 मिळकतधारकांनी मालमत्ताकर बिलाचा भरणा केला आहे. उर्वरित मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर बिल भरावे, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

Property Tax
Lonavala Development Projects: लोणावळ्याचा विकास वेगाने! रखडलेला उड्डाणपूल, तलाव सुशोभीकरणासह मोठ्या प्रकल्पांना गती

शहरात 7 लाख 44 हजार 630 मालमत्ता

शहरामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच, मोकळ्या जागांसह एकूण 7 लाख 44 हजार 630 नोंदणीकृत मालमत्ता आहेत. महापालिकेकडून महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग नागरिक,पर्यावरणपूरक हाऊसिंग सोसायट्यांना विविध सवलती देण्यात येत आहेत.

Property Tax
Pimpri Chinchwad Tree Damage Issue: चिखली-मोशीमध्ये झाडांच्या बुंध्यांभोवती काँक्रिटीकरणामुळे पर्यावरणप्रेमी संतप्त

ऑनलाइन कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी 10 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष गर्दी टाळून घरबसल्या ऑनलाइन माध्यमातून मालमत्ताकर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Property Tax
Akurdi Railway Station Redevelopment: अमृत भारत योजनेतून आकुर्डी रेल्वे स्थानकाचा कायापालट; आधुनिक सुविधांनी सज्ज नवे रूप

शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून कर भरण्यास प्राधान्य देत आहेत. त्यातून 10 टक्के सवलतीचाही लाभ घेतला आहे. सुलभ ऑनलाइन माध्यमातून बिल भरावे. उर्वरित मालमत्ताधारकांपर्यंतही लवकरच बिले देण्यात येत आहेत, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

Property Tax
Pimple Nilakh Flyover Issue: पिंपळे निलख उड्डाण पुलाचा तीव्र उतार ठरतोय धोकादायक; अपघातांनंतर सुरक्षितता ऑडिट होणार

ऑनलाईन कर भरण्यास प्राधान्य

पालिकेकडून 30 जून 2026 पूर्वी मालमत्ताकर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्याला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 2 लाख 8 हजार 570 नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ताकर भरून 10 टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या नागरिकांकडून 212 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ताकराचा भरणा डिजिटल माध्यमातून करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news