Ramabai Ambedkar Memorial: रमाई आंबेडकर स्मारक उभारणीस 19 कोटी 36 लाख; स्थायी समितीकडून विविध कामांना मान्यता

सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते.
Ramabai Ambedkar Memorial
Ramabai Ambedkar MemorialPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी स्मारकाच्या मागील बाजूच्या मोकळ्या जागेत माता रमाई आंबेडकर स्मारक उभारण्यात येणार आहे. तेथे माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासोबत स्थापत्य व विद्युतविषयक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी 19 कोटी 36 लाख खर्चास विविध विकासकामांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. या वेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगर सचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, समितीचे सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते.

माता रमाई आंबेडकर स्मारक उभारण्याच्या कामासाठी स्थापत्य उद्याप व क्रीडा विभागाने 23 कोटी 54 लाख 96 हजार खर्चाची निविदा काढली होती. त्यात चार ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यातील तीन निविदा पात्र ठरल्या.

त्यापैकी बी. के. खोसे यांची 18.07 टक्के कमी दराची 19 कोटी 36 लाख खर्चाची निविदा पात्र ठरली आहे. कमी दर असल्याने ठेकेदाराकडून तब्बल 2 कोटी 85 लाख 90 हजार रुपये अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम 18 एप्रिलला जमा करून घेण्यात आली आहे. या खर्चास समितीने आयत्या वेळी मान्यता दिली आहे.

Ramabai Ambedkar Memorial
Pimpri Chinchwad News: घोषणांचा पाऊस, पण विकास कुठे? पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; घोटाळ्यांची मालिका सुरुच

महाालिकेच्या शाळा, रुग्णालय, क्षेत्रीय कार्यालय, नाट्यगृहांचे फायर सेफ्टी ऑडिटनुसार कामे करणे, महापालिकेच्या विविध विभागांसाठी 65 इंची 20 एलईडी टीव्ही खरेदीस 16 लाख 4 हजार रुपये खर्च आहे.

महापालिकेच्या चार शाळांसाठी स्मार्ट किड्स फिटनेस इक्विपमेंट साहित्य चार किटसाठी 16 लाख 60 हजार खर्च करणे, स्वच्छ भारत अभियान व ‌‘माझी वसुंधरा अभियान‌’अंतर्गत प्रकल्पाचे कामकाज चालवण्यासाठी एजन्सीची निवड करणे, चिंचवड गाव येथील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाच्या स्वच्छतेविषयी कामाकरिता दोन सफाई कर्मचाऱ्यांची 8 महिन्यांसाठी नेमणुकीस 4 लाख 26 हजार खर्च आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पूर्वेकडील वाकड-पुनावळे-ताथवडे व प्रभागातील इतर परिसरातील नव्याने ताब्यात येणारे रस्ते विकसित करण्यासाठी 26 लाख 42 हजार खर्च करणे, मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यासाठी संस्थेची नेमणूक करणे आदी खर्चास समितीने मान्यता दिली आहे.

‌‘जाणता राजा‌’ महानाट्यासाठी 27 लाख 84 हजार खर्चास मंजुरी

महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी महापालिकेकडून लेखक बाबासाहेब पुरंदरे लिखित ‌‘जाणता राजा‌’ हे महानाट्य शहरात घेण्याची शिफारस महापौर रवी लांडगे यांनी केली आहे. त्यानुसार, त्या महानाट्यातील कलाकारांचे मानधन, मंडप, स्टेज, साउंड सिस्टीम, घोडे, बैलगाडी, प्रसिद्धी यावर 27 लाख 84 हजार रुपये खर्च केला जाणार आहे. त्या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे. पूर्णानगर, चिंचवड येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे दुसऱ्या टप्प्यातील काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सचिन शहा यांची आर्किटेक्ट म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Ramabai Ambedkar Memorial
Air Pollution: प्रदूषण करणारे 14 आरएमसी प्लान्ट सील; महापालिकेकडून 22 प्लान्टची तपासणी

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणता वाढल्याने नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्या बालकांसह महिला व ज्येष्ठ नागरिक जखमी होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी 4 पशुवैद्यकीय अधिकारी, 1 पशुधन पर्यवेक्षक आणि 7 डॉग पिग कुली यांची 21 ऑगस्ट 2025 ला हंगामी तत्वावर नियुक्ती केली आहे. त्यांना आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देऊन 33 लाख 32 हजार 874 रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

रावेत पुलाच्या सुशोभिकरणावर 57 लाखांचा खर्च

रावेत येथील संत तुकाराम महाराज पुलावर (बॉस्केट ब्रिज) विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. त्यासाठी डेकोरेटिव्ही फिटींग पोल बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्युत विभागाने 85 लाख खर्चाची निविदा काढली होती. मात्र, 32.32 टक्के कमी दराची बोंद्रे ॲण्ड असोसिएट्सची 57 लाख 28 हजार खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. तसेच, उद्यान विभागाचे काम संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. त्याद्वारे उद्यान तसेच, रस्ते दुभाजक देखभालीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवले जात आहे. त्याकामास 10 महिने मुदतावाढ देऊन 11 लाख 79 हजार खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news