Pimpri Chinchwad Potholes: पिंपरी-चिंचवडमधील २,१६४ खड्ड्यांपैकी १,६०९ बुजवले; उर्वरित ५५५ खड्ड्यांवर काम सुरू

महापालिकेचा दावा; तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई, दोषी ठेकेदारांनाही दणका
Pothole Repair Work
Pothole Repair WorkPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत वेगाने सुरू आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी व विविध माध्यमांतून येणार्‍या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात आहे.

Pothole Repair Work
Pimpri Chinchwad Women Police Officers: पिंपरी-चिंचवड पोलिस दलात ६४ महिला अधिकारी; नेतृत्वाच्या ‘फ्रंटलाइन’वर मात्र प्रतिनिधित्व कमी

संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत पाहणी करून आवश्यकतेनुसार खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आतापर्यंत २ हजार १६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १ हजार ६०९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित ५५५ खड्ड्यांची डागडुजी सुरू आहे, असा दावा स्थापत्य विभागाने मंगळवार (दि. ११) केला आहे.

Pothole Repair Work
Chakan Talegaon Traffic: चाकण-तळेगाव वाहतूक कोंडी सुटणार? पीएमआरडीएकडून चार बाह्यवळण मार्गांचा प्रस्ताव

स्थापत्य विभागामार्फत शहरातील विविध रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. खड्ड्यांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे पथक त्या ठिकाणी जाऊन पाहणी करते. खड्ड्याचा आकार, खोली, रस्त्याची स्थिती, वाहतुकीची वर्दळ व पावसाची परिस्थिती याचा विचार करून दुरुस्तीसाठी योग्य साहित्य निवडले जाते. त्यानंतर खड्डा बुजवला जातो. आतापर्यंत बुजविण्यात आलेल्या १ हजार ६०९ खड्ड्यांपैकी ५५६ खड्डे कोल्ड मिक्स, २३ बीबीएम, ७५४ जीएसबी, १२० पेव्हिंग ब्लॉक आणि १५६ खड्डे काँक्रीटच्या माध्यमातून बुजविण्यात आले आहेत.

Pothole Repair Work
Akurdi Nigdi School Traffic: आकुर्डी-निगडीतील शाळांबाहेर वाहतूक कोंडीचा विळखा; विद्यार्थी-पालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडण्याची वेळ

तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या अभियंत्यांवर कारवाई करणार

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत संबंधित यंत्रणांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची आहे. विभागप्रमुखांनी या कामावर नियमित नियंत्रण ठेवण्याबाबत तसेच, तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या अभियंत्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

Pothole Repair Work
Pavan Maval Soybean Pest: पवन मावळात सोयाबीनवर किडींचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सतर्कतेचा इशारा

दोषी ठेकेदारांवर कारवाई करणार

पावसाळ्यात रस्ते व डांबराचे साहित्य ओलसर असल्याने डांबरीकरणासाठी आवश्यक गुणवत्ता मिळत नाही. त्यामुळे सध्या नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर, डांबर प्लांट सुरू झाल्यावर पावसाळ्यात तात्पुरती दुरुस्ती केलेल्या ठिकाणांची पुन्हा पाहणी केली जाईल. आवश्यकतेनुसार या ठिकाणी कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात येणार आहे. दोषदायित्व कालावधी लागू असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास संबंधित ठेकेदारामार्फतच दुरुस्ती करून घेण्यात येणार आहे. दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news