

पिंपरी: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र तुकाराम हगवणे याने गुन्हा घडल्यानंतर पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत पोलिस तपासापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने अनेक लॉज, फार्महाऊस, मित्रांची घरे तसेच हॉटेल्समध्ये मुक्काम करत स्थानिक मदतीच्या आधारे ठिकाणे बदलली. पोलिस तपासात हा संपूर्ण प्रवास उघड झाला असून, त्याला मदत करणार्यांवर आता पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
सून वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर राजेंद्र हगवणे आपल्या मुलाला घेऊन औंध येथील रुग्णालयात गेला. तेथून त्याचा प्रवास मुळशीमधील मुहूर्त लॉन्स मार्गे वडगाव मावळकडे झाला. यानंतर त्याने पवना डॅम परिसरातील एका खासगी फार्महाऊसवर आश्रय घेतला. (Latest Pune News)
त्याठिकाणी त्याचा मुक्काम होता. यानंतर त्याने आळंदीतील लॉजवर मुक्काम केला होता. ही सर्व ठिकाणे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात असून, गर्दीपासून दूर असल्यामुळे त्याला पोलिस तपासापासून लपून राहण्यास मदत झाली.
दरम्यान, 18 मे रोजी पुन्हा तो कार बदलून वडगाव मावळ भागात गेला. त्यानंतर एका बेळगाव (कर्नाटकमधील) नोंदणी असलेल्या गाडीतून त्याने प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे. 19 मे रोजी सातार्यातील पुसेगाव येथील अमोल जाधव याच्या शेतावर गेला.
त्यानंतर पसरणी मार्गे तो थेट कोगनोळीकडे रवाना झाला. हॉटेल हेरिटेजमध्ये ते दोन दिवस थांबले होते. या काळात तो सतत गाडी बदलत होता; तसेच मोबाईल बंद ठेवून संवाद टाळत होता. यामुळे पोलिसांना त्याचा मागोवा घेणे अवघड गेले. अखेर 22 मे रोजी तो पुण्यात परतत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
या संपूर्ण पलायनात राजेंद्र हगवणे याला कोणत्या- कोणत्या व्यक्तींची मदत मिळाली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथक नियुक्त केले आहे. यामध्ये वाहन उपलब्ध करून देणारे, लॉज किंवा हॉटेल्समध्ये विनानोंद मुक्काम करू देणारे, आर्थिक मदत करणारे तसेच मार्गदर्शन करणारे अशा चार ते पाच जणांची चौकशी सुरू आहे. काहींना समन्स बजावण्यात आले असून, लवकरच वरिष्ठ अधिकार्यांसमोर जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरु असून आरोपीच्या हालचालींसोबत त्यांना साथ देणार्या व्यक्तींच्या हालचालीही पोलिसांनी टिपल्या आहेत. सर्व लॉज, हॉटेल्स आणि फार्महाऊसची सीसीटीव्ही फुटेज तपासली जात असून, काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. मदत करणार्यांवर काय होऊ शकते कारवाई
1) बीएनएस कलम 258 (पूर्वीचे आयपीसी कलम 212) : जर कोणी आरोपीस आश्रय दिला, पळवून लावले किंवा पोलिसांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवले, तर हे Causing disappearance of evidence या गुन्ह्यात मोडते. अशा व्यक्तीस तीन वर्षांपर्यंत कारावास व दंड होऊ शकतो.
2) बीएनएस कलम 228 (पूर्वीचे आयपीसी कलम 201) : गुन्हा घडल्यानंतर त्याचे पुरावे नष्ट करणं, लपवणे किंवा दिशाभूल करणे हे उर्रीीळपस वळीरिशिरीरपलश ेष र्शींळवशपलश या अंतर्गत येते. यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंत कारावास व दंड लागू शकतो, जो गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार ठरतो.
3) बीएनएस कलम 61 (पूर्वीचे आयपीसी कलम 120ब) : गुन्ह्याच्या नियोजनात सहभागी होणे किंवा कटात सामील होणे हे उीळाळपरश्र लेपीळिीरलू मानले जाते. अशा वेळी, गुन्हा सिद्ध झाल्यास मदत करणार्यालाही मूळ गुन्ह्यासाठी ठरलेलीच शिक्षा दिली जाऊ शकते.
4) बीएनएस कलम 3(3) (पूर्वीचे आयपीसी कलम 34): गुन्ह्याच्या उद्देशात सामूहिक सहभाग, मदत किंवा सहकार्य केल्यास, उेाोप ळपींशपींळेप नुसार सर्व आरोपींवर समान गुन्हा लागू होतो. अशा वेळी मदत करणार्यासही सहकारी म्हणून दोषी ठरवले जाऊ शकते.
आर्थिक फायद्यासाठी सोने तारण
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे 51 तोळे सोने एका बँकेत तारण ठेवून आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून अधिकृत पत्रव्यवहार सुरू केला आहे. बँकेने तारण स्वीकारलेल्या या सोन्याबाबत पोलिसांनी तपशीलवार माहिती मागवली असून, त्याचे हस्तांतरण व जप्ती प्रक्रियेसाठी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
आरोपी राजेंद्र हगवणे याने गुन्हा घडल्यानंतर सतत ठिकाणे बदलत तपासाची दिशाभूल केली. या दरम्यान त्याला मदत करणार्या काही व्यक्तींची ओळख पटली आहे. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील. - सुनील कुर्हाडे, सहायक पोलिस आयुक्त, वाकड विभाग.