Pimpri Chinchwad Police Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मदतीचा हात; एक कोटींचा निधी उभारणार

५ हजार ३०० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून मदत; मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा होणार
Police Drought Relief
Police Drought ReliefPudhari
Published on: 
Updated on: 

संतोष शिंदे

पिंपरी: दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस दल सरसावले आहे. पोलिस आयुक्तालयातील तब्बल ५ हजार ३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून सुमारे एक कोटी रुपयांचा मदतनिधी उभारला जाणार आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे.

Police Drought Relief
Talegaon Dabhade Water Conservation: तळेगाव दाभाडेकरांनो, पाणी जपून वापरा! संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे आवाहन

राज्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातून निधी संकलित करण्यात येत आहे. एकूण रक्कम सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून, प्रत्यक्ष वेतनकपातीनंतर अंतिम आकडा स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Police Drought Relief
PCMC Corruption Allegations: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खळबळ; भाजप नगरसेवकाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १६ ऑक्टोबर रोजी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने एक दिवसाचे वेतन देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, भारतीय वन सेवा तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांच्या आधारे एक दिवसाच्या वेतनाची गणना केली जाणार आहे. संकलित निधीचा कर्मचारीनिहाय स्वतंत्र हिशोब ठेवून रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येईल. कायदा-सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या पोलिस दलाचा हा आर्थिक सहभाग दुष्काळग्रस्तांच्या मदतकार्यास मोठा हातभार लावणारा ठरणार आहे.

Police Drought Relief
PCMC Corporator Fund: नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीवर महापालिकेचे निर्बंध; २५ लाखांवरील कामांना स्थायी समितीची मंजुरी आवश्यक

बळीराजासमोर जगण्याचा संघर्ष

दुष्काळामुळे शेतकऱ्यांपुढे केवळ पिके वाचविण्याचेच नव्हे, तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याचेही आव्हान आहे. पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाल्यास बियाणे, खते, मजुरी आणि मशागतीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती असते. त्यात शेतीकर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च भागविण्याची चिंता वाढत राहते. जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेही कठीण होते. शेतीवरील उत्पन्न घटल्यास शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणे महत्त्वाचे ठरते.

निधी संकलनाची स्वतंत्र नोंद ठेवणार

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील ५ हजार ३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येकाचे सरासरी योगदान १,८८७ रुपये इतके होते. मात्र, वेतनश्रेणीनुसार प्रत्यक्ष रक्कम वेगवेगळी असणार आहे. निधी संकलनाची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार असून, देणगीदारांना नियमानुसार आयकर सवलतीची तरतूद आहे.

Police Drought Relief
Pimpri Chinchwad Hawkers Zone: पिंपरी-चिंचवडमध्ये ४१ हॉकर्स झोन कागदावरच; चार वर्षांत केवळ १,५०६ विक्रेत्यांना प्रमाणपत्र!

नकार देण्याचाही अधिकार

दुष्काळग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन करण्यात आले असले, तरी वेतनकपातीला हरकत घेण्याचा पर्यायही शासनाने खुला ठेवला आहे. आर्थिक अडचणी किंवा वैयक्तिक कारणांमुळे योगदान देणे शक्य नसलेल्या कर्मचाऱ्यांना विहित नमुन्यात हरकत नोंदविता येणार आहे. त्यासाठी संबंधित कार्यालयाकडे दोन दिवसांत अर्ज सादर करण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे, एक दिवसाच्या वेतनापेक्षा कमी रक्कम कपात करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मदतनिधीत पूर्ण एक दिवसाचे वेतन देणे किंवा कपातीस हरकत नोंदविणे, असे दोन पर्याय कर्मचाऱ्यांसमोर आहेत.

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. राज्य शासनाच्या आवाहनानुसार पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतन कपतीतून निधी उपलब्ध होणार आहे. पिंपरी- चिंचवड पोलिस दल नागरिकांच्या सुरक्षेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीही कटिबद्ध आहे.

विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.