Talegaon Dabhade Water Conservation: तळेगाव दाभाडेकरांनो, पाणी जपून वापरा! संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे आवाहन

मुख्य जलवाहिनीची गळती काही तासांत थांबवली; पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाच्या नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
Talegaon Dabhade Nagar Parishad
Talegaon Dabhade Nagar ParishadPudhari
Published on: 
Updated on: 

तळेगाव दाभाडे: येत्या काळात पाण्याची उपलब्धता कमी होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता तळेगाव दाभाडे नगर परिषदेने नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक असल्याचे नगर परिषद पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

Talegaon Dabhade Nagar Parishad
PCMC Corruption Allegations: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खळबळ; भाजप नगरसेवकाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नगर परिषद प्रशासनाने नागरिकांसाठी पाणीबचतीसंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक नागरिकाने घरातील तसेच घराबाहेरील सर्व नळांना पाण्याच्या तोट्या बसवाव्यात. नळ सुरू ठेवून पाण्याचा अपव्यय करू नये. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुण्यासाठी तसेच रस्ते, अंगणे आणि इमारती स्वच्छ करण्यासाठी टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Talegaon Dabhade Nagar Parishad
PCMC Corporator Fund: नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीवर महापालिकेचे निर्बंध; २५ लाखांवरील कामांना स्थायी समितीची मंजुरी आवश्यक

तसेच घरातील पाण्याच्या टाक्या भरताना पाणी ओव्हरफ्लो होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार ऑटोमॅटिक बॉल व्हॉल्व्ह बसवावेत. परिसरात कुठेही पाण्याची गळती किंवा अपव्यय आढळल्यास नागरिकांनी तातडीने नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला त्याची माहिती द्यावी, असेही प्रशासनाने सूचित केले आहे.

Talegaon Dabhade Nagar Parishad
Pimpri Chinchwad Hawkers Zone: पिंपरी-चिंचवडमध्ये ४१ हॉकर्स झोन कागदावरच; चार वर्षांत केवळ १,५०६ विक्रेत्यांना प्रमाणपत्र!

नुकताच तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पुणे-मुंबई महामार्गालगत विजय मारुती खिंड येथे गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची बाब निदर्शनास येतात उपनगराध्यक्ष गणेश काकडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांच्या पुढाकाराने काही तासातच ही पाणी गळती थांबवण्यात आली व भविष्यात पुन्हा ही समस्या होऊ नये, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना सुरू असल्याचे अभिषेक शिंदे यांनी सांगितले.

Talegaon Dabhade Nagar Parishad
Hinjewadi Shivajinagar Metro: हिंजवडीकरांचा वाहतूक कोंडीतून लवकरच सुटकेचा मार्ग; ४ नोव्हेंबरपासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत

पाणी ही मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून तिचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आज वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब उद्याच्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी बचतीच्या सूचनांचे काटेकोर पालन करून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.