PCMC Corruption Allegations: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खळबळ; भाजप नगरसेवकाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

भूखंड व्यवहार, अनधिकृत बांधकामे, बीआरटी आणि कचरा व्यवस्थापनावर गंभीर आरोप; चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा
Corruption
CorruptionPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये अधिकारी, ठेकेदार व बांधकाम व्यावसायिकांचे संगनमत सुरू असून, प्रशासनाचा भ्रष्ट कारभार सुरू आहे. शहरात अनधिकृत बांधकामांचा सुटलेला सुळसुळाट, भूखंड घोटाळे, बीआरटी व कचरा व्यवस्थापनाचा उडालेला बडगा, नागरी सुविधांची दैना झाली आहे. त्यासंदर्भात भाजपचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. आयुक्तांनी या सर्व गैरप्रकारांची चौकशी करून कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

Corruption
PCMC Corporator Fund: नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीवर महापालिकेचे निर्बंध; २५ लाखांवरील कामांना स्थायी समितीची मंजुरी आवश्यक

नगरसेवक शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील गरवारे कंपनीच्या भूखंडावर आयटूआर प्रकल्प राबविताना नियमानुसार महापालिकेला मिळणारा मुख्य रस्त्याच्या बाजूने भूखंड न देता, अधिकार्‍यांशी संगनमत करून मागील कोपर्‍यातील कमी मूल्याचा भूखंड माथी मारण्यात आला आहे. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नगर रचना व बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकार्‍यांची तातडीने चौकशी करून कारवाई करावी.

Corruption
Pimpri Chinchwad Hawkers Zone: पिंपरी-चिंचवडमध्ये ४१ हॉकर्स झोन कागदावरच; चार वर्षांत केवळ १,५०६ विक्रेत्यांना प्रमाणपत्र!

दापोडी ते निगडी बीआरटी मार्गामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. कचरा वाहनांचे कोणतेही नियोजन नाही. पाच पाच दिवस कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्बन स्ट्रीट डिजाईनच्या प्रशस्त पदपथावर अतिक्रमणे वाढली आहेत. शहरात सर्रासपणे नदीपात्र बुजवण्याचे काम सुरू असून, महापालिकेच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमणे करून त्याद्वारे लाखो रुपयांचे घोटाळे अधिकार्‍यांच्या मेहेरबानीने सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

Corruption
Hinjewadi Shivajinagar Metro: हिंजवडीकरांचा वाहतूक कोंडीतून लवकरच सुटकेचा मार्ग; ४ नोव्हेंबरपासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत

चिंचवडमधील एका रुग्णालयात गरीब रुग्णांना हक्काच्या सवलतीच्या खाटा नाकारून लूट सुरू आहे. तेथे कार्यरत कर्मचार्‍यांचे अनेक महिन्यांचे वेतन थकले आहे. जुन्या इमारतीवर विना-स्ट्रक्चरल ऑडिट सुरू असलेल्या धोकादायक बेकायदेशीर बांधकामामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने ते काम थांबण्यात यावे, अशी तक्रार त्यांनी केली आहे.

Corruption
Pimpri Mother Son Death Case: डांगे चौकात १८व्या मजल्यावरून पडून आई-मुलाचा मृत्यू; घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट

तब्बल अडीच कोटींच्या गैरव्यवहाराकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

चिंचवड येथील एका हाऊसिंग सोसायटीमध्ये मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. टीडीआर, एफएसआयच्या नावाखाली तब्बल 336 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा वापर करून संपूर्ण एक मजला बेकायदा बांधण्यात आला. हा अनधिकृत मजला विकून सुमारे 2 कोटी 50 लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. याचे तातडीने तांत्रिक ऑडिट करून बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्टवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार नगरसेवक शीतल शिंदे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.