Pimpri Chinchwad Police: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या शस्त्रविरोधी मोहिमेचा राज्यभर डंका

चार वेळा राबविलेल्या मोहिमेत 263 पिस्तूल, 363 काडतुसे आणि तब्बल 679 घातक हत्यारे जप्त
Pimpri Chinchwad Police
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या शस्त्रविरोधी मोहिमेचा राज्यभर डंकाPudhari
Published on
Updated on

पिंपरी: घातक शस्त्रांचे रॅकेट उखडून फेकण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने हाती घेतलेली शस्त्रविरोधी मोहीम राज्यभर गाजत आहे. 19 जानेवारी 2023 पासून 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत सलग चार वेळा ही मोहीम राबवण्यात आली.

यामध्ये तब्बल 263 पिस्तूल, 363 जिवंत काडतुसे आणि 679 विविध घातक शस्त्रे पोलिसांच्या हाती लागली. या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राज्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. (Latest Pimpri News)

Pimpri Chinchwad Police
Pimpri Market Update: कारली, लालभोपळा अन्‌‍ पालेभाज्यांना मागणी वाढली

अभिनव संकल्पना आणि काटेकोर अंमलबजावणी

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्पर्धात्मक स्वरूपात राबवण्यात आली. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून ही योजना आकाराला आली. विविध गुन्हे शाखा, युनिट्स आणि पोलिस पथकांमध्ये कार्यक्षमतेची जाणीव निर्माण करण्यासाठी गुणपद्धती अवलंबली गेली.

कोयता, तलवार, पालघन, सुरा, चाकू यांसारख्या हत्याराला एक गुण आणि पिस्तुल जप्त केल्यास दहा गुण देण्यात आले. या गुणपद्धतीमुळे प्रत्येक पथकाने पिस्तुल जप्तीवर अधिक भर दिला. परिणामी केवळ पारंपरिक हत्यारेच नव्हे, तर अवैध पिस्तुले आणि जिवंत काडतुसे मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या हाती लागली.

राज्य पातळीवर कौतुक

प्रत्येक जिल्हा व आयुक्तालय पातळीवर अधूनमधून अवैध शस्त्रविरोधी कारवाई होत असते; मात्र पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या कारवाईला मोहिमात्मक स्वरूप देऊन अंतर्गत स्पर्धा निर्माण केली. त्यामुळे कमी कालावधीत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले. राज्यातील इतर कोणत्याही आयुक्तालयाने आजवर अशी पद्धत अवलंबलेली नव्हती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही धडाकेबाज मोहीम राज्यभर कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे.

घातक शस्त्रांचा सर्रास वापर थांबला

उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात यापूर्वी अनेक गुन्ह्यांत अवैध शस्त्रांचा वापर झाल्याचे समोर आले आहे. किरकोळ वाद, टोळक्यांचे संघर्ष किंवा वर्चस्वाच्या वादातून पिस्तूल, कोयते, तलवारी वापरून हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या; मात्र या मोहिमेमुळे गुन्हेगारांना होणारा शस्त्रसाठ्याचा पुरवठा खंडित झाला. त्यामुळे या काळात अपवाद वगळता गोळीबाराच्या घटना घडल्या नाहीत; तसेच मोठ्या गुन्ह्यांनाही आळा बसला. एकंदरीत शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात या मोहिमांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते.

Pimpri Chinchwad Police
Pimpri News: नेटवर्किंग कंपन्यांकडे कोट्यवधींची थकबाकी

शस्त्रविरोधी मोहिमेचे फायदे

  • शस्त्रविरोधी मोहिमेचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम

  • गुन्हेगारांकडील मोठा शस्त्रसाठा मोडीत निघाला

  • नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण

  • व्यापारी, उद्योजक, दुकानदारांना दिलासा

  • पोलिस दलात गुणात्मक स्पर्धा विकसित

  • भविष्यातील मोठ्या गुन्ह्यांना पायबंद

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अवैध शस्त्रांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शस्त्रविरोधी मोहिमेतील गुणांकन पद्धतीमुळे पोलिस पथकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे जप्तीचे प्रमाण वाढले. गुन्हेगारांकडील शस्त्रसाठा कमी होऊन संभाव्य गुन्ह्यांना चाप बसला आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या मोहिमा राबवून गुन्हेगारी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news