Pimpri Chinchwad Scrap Transport: पिंपरी-चिंचवडमध्ये उघड्यावर स्क्रॅप वाहतूक; अपघाताचा धोका वाढला, कारवाईची मागणी

ताडपत्री किंवा सुरक्षात्मक जाळीविना धातू भंगाराची वाहतूक सुरू; रस्ते सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Pimpri Chinchwad Scrap Transport
Pimpri Chinchwad Scrap TransportPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत औद्योगिक भंगार व धातूचा कचरा उघड्यावर वाहून नेण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. शहरातील प्रमुख रस्ते व उड्डाणपूल मार्गावर एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात धातूचे स्क्रॅप कोणतेही ताडपत्री किंवा सुरक्षात्मक जाळी न लावता वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

Pimpri Chinchwad Scrap Transport
Anna Bhau Sathe Jayanti: पिंपरी-चिंचवडमध्ये अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व; सात दिवस सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी

अशा प्रकारच्या निष्काळजी वाहतुकीमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताचा धोका वाढला आहे. औद्योगिक स्क्रॅप, लोखंडी तुकडे किंवा इतर भंगार साहित्य ट्रकमधून वाहतूक करताना ते व्यवस्थित झाकणे आणि सुरक्षितपणे बांधणे अपेक्षित असते.

Pimpri Chinchwad Scrap Transport
Junk Food Ban In Schools: पिंपरी-चिंचवडमध्ये शाळांजवळ जंक फूडचा सुळसुळाट; ५० मीटर परिसरातील विक्रीवर बंदीची अंमलबजावणी रखडली

मात्र अनेक वाहनांमध्ये हे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येते. वाहन चालू असताना लहान-मोठे तुकडे रस्त्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Pimpri Chinchwad Scrap Transport
Pimpri Chinchwad Cyber Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; दोन तरुणांवर गुन्हे, बँक खात्यांचा फसवणुकीसाठी वापर

याशिवाय उघड्यावर वाहतूक केल्यामुळे धूळ, कचरा आणि सूक्ष्म धातूचे कण हवेत पसरतात. याचा परिणाम पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. शहरातील औद्योगिक क्षेत्रात अशा वाहनांची नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Pimpri Chinchwad Scrap Transport
Pimpri Chinchwad Rain: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा कहर; रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

उघड्यावर औद्योगिक कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवावी. सर्व स्क्रॅप वाहतूक करणाऱ्या वाहनांना ताडपत्री किंवा सुरक्षात्मक जाळी बंधनकारक करावी. ओव्हरलोड व असुरक्षित वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करावी. औद्योगिक कंपन्यांना सुरक्षित वाहतुकीबाबत सक्त सूचना द्याव्यात. भंगार किंवा स्क्रॅपची वाहतूक करताना सुरक्षितता नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे,हवेत उडनारे कण डोळ्यात गेल्यास गंभीर इजा होउ शकते. उघड्यावर किंवा ओव्हरलोड वाहतूक केल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनांवर प्रशासनाकडून नियमित कारवाई करणे गरजेचे आहे. शहर वाहतूक विभागानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जितेंद्र मोरे, दुचाकीस्वार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news