Lonavala Connecting Link Accident: लोणावळा कनेक्टिंग लिंकवर ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; दोघे गंभीर

पहाटेच्या अपघातात ६ ते ७ प्रवासी किरकोळ जखमी; बसमध्ये सुमारे ४० प्रवासी, पोलिसांची तातडीने मदत
Lonavala Connecting Link Accident
Lonavala Connecting Link AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

लोणावळा: पुणे-मुंबई महामार्गावरील लोणावळा येथील कनेक्टिंग लिंकवर मंगळवारी (दि. ६) पहाटे ४.५० च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. वेगात असलेल्या एका ट्रॅव्हल्सचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बसने समोर चाललेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असून, अन्य ६ ते ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Lonavala Connecting Link Accident
Pimpri Chinchwad Heavy Vehicle Action: पिंपरी-चिंचवाडमध्ये जड वाहनांवर पोलिसांचा दंडाचा ‘हातोडा’; ९ महिन्यांत ९० हजार वाहनांवर कारवाई

कंटेनरचालक मुहम्मद हमीद सुहेब (वय ३०, रा. कन्नूर, तामिळनाडू) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. दुसर्या गंभीर जखमी व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मंगळवारी पहाटे ४.५० च्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर (कनेक्टिंग लिंक किलोमीटर ०८/१००, सीपी १९ व सीपी २० दरम्यान) हा अपघात घडला.

Lonavala Connecting Link Accident
Classical Marathi Language Week: पिंपरी-चिंचवाडमध्ये अभिजात मराठीचा जागर; भाषा घराघरांत, शाळांमध्ये आणि व्यवहारात जगविण्याचा सूर

कंटेनरचालक मुहम्मद हमीद सुहेब हे (टीएन ०२ सीबी ००३१) मुंबईच्या दिशेने जात होते. या वेळी मागून आलेल्या ट्रॅव्हल्स बस (एमएच २० इएल ५१००) चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने कंटेनरला जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते.

Lonavala Connecting Link Accident
Pimpri Durgadevi Hill Tree Cutting: पिंपरीच्या दुर्गादेवी टेकडीवर वृक्षतोडीचा प्रकार; पर्यावरणप्रेमी संतप्त, चौकशीची मागणी

अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ, हवालदार माने, बनकर, भोसले, पोलिस शिपाई साळुंखे, बोराडे तसेच एमएसएफ जवान गोपाळ आणि चव्हाण यांनी अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथकाने तत्काळ रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी हलवले.

Lonavala Connecting Link Accident
Pimpri Chinchwad Open Gym: पिंपरी-चिंचवडमध्ये १८७ ओपन जिम; कुठे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तर कुठे उपकरणे धूळ खात

गंभीर आणि किरकोळ जखमींना लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटल, तळेगाव येथील पवना हॉस्पिटल आणि खोपोली नगर परिषद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने दोन्ही वाहने रस्त्याच्याकडेला घेऊन सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. बसमधील इतर उर्वरित प्रवाशांना पर्यायी वाहनांची व्यवस्था करून रवाना करण्यात आले आहे. घटनेचा तपास लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news