Pimpri Chinchwad Municipal Voting: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: 15 रोजी मतदान, 16 ला मतमोजणी

आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसह प्रशासन सज्ज
Pimpri Chinchwad Municipal Voting
Pimpri Chinchwad Municipal VotingPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार (दि. 15) मतदान तर, शुक्रवार (दि. 16) मतमोजणी होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महापालिकेची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकारी व कर्मचारी यांनी ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Voting
Pimpri Chinchwad Municipal Election: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: आज प्रचाराची सांगता

निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे निवडणूक कामकाजाविषयक आढावा बैठक आयुक्त हर्डीकर यांनी घेतली. या वेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मतराव खराडे, अर्चना तांबे, अनिल पवार, दीप्ती सूर्यवंशी, नितीन गवळी, सुप्रिया डांगे, अर्चना पठारे, पल्लवी घाडगे तसेच, सहाआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, पंकज पाटील, संदीप खोत, चेतना केरूरे, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Municipal Voting
APAR ID Registration: अपार आयडी नोंदणीला 30 जानेवारीची अंतिम मुदत

आयुक्त हर्डीकर म्हणाले की, महापालिका निवडणूक प्रचार मंगळवार (दि. 13) सायंकाळी 5.30 ला संपत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया संपेपर्यंतचा कालावधी महत्त्वाचा असतो. अशावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच, कोणताही अनुसूचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधून बारकाईने लक्ष ठेवा. याकाळात आचारसंहिता कक्षाने प्रभावीपणे एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी अशी विविध पथके कार्यरत ठेवावीत. मतदार चिठ्ठ्या (व्होटर स्लीप) मतदारांपर्यंत वाटप करण्याचे काम विहित वेळेत पूर्ण करावे. ईव्हीएम हाताळणी व ईव्हीएमची वाहतूक यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास नियमान्वये कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Municipal Voting
Pimpri Teachers Non Academic Work: शिक्षकांवर भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची जबाबदारी; संघटनांचा तीव्र विरोध

मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे साहित्य मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत असताना आवश्यक बाबींची माहिती संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना द्यावी. मतदान प्रक्रिया ही संवेदनशील बाब असून प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. मतदानाचा लेखोजोखा अत्यंत बारकाईने संकलित करावा. मॉक पोल व्यवस्थित घेऊन राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नमुन्यानुसार त्याचे प्रमाणपत्र तयार करण्यात यावे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर आचारसंहिता भंगाच्या आलेल्या तक्रारींवर कशा प्रकारे कारवाई करावी, याबाबत मार्गदर्शन केले. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मतदान प्रक्रियेच्या दिवशी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने सादर करावयाच्या कामकाज अहवालाबाबत माहिती दिली. उपायुक्त सचिन पवार यांनी मतदान प्रक्रिया व मतमोजणीच्या अनुषंगाने निवडणूक विभागातर्फे करण्यात आलेल्या तयारीबाबत सादरीकरण केले.

Pimpri Chinchwad Municipal Voting
Ajit Pawar PCMC Election: ‘चुका सांगणे म्हणजे युतीधर्म न पाळणे का?’ : अजित पवारांचा फडणवीसांना सवाल

आज सायंकाळपासून तातडीने बॅनर्स, झेंडे काढून घ्या

महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची मुदत मंगळवार (दि. 13) सायंकाळी 5.30 ला संपणार आहे. त्यानंतर उमेदवार, पक्ष यांच्या जाहीर प्रचाराचे बॅनर्स, झेंडे, पोस्टर्स तातडीने हटवण्याचे काम संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी करावे. पुढील 72 तास खूप महत्त्वाचे असून, त्या काळात चांगल्या पद्धतीने व नियोजनपूर्वक काम करा, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news