PCMC Election 2025: भाजपचे 31, राष्ट्रवादीच्या 10; दिग्गजांचा पत्ता कट?

47 माजी नगरसेवक अडचणीत; बंडखोरी आणि नव्या लढतींची शक्यता
भाजपचे 31, राष्ट्रवादीच्या 10; दिग्गजांचा पत्ता कट?
भाजपचे 31, राष्ट्रवादीच्या 10; दिग्गजांचा पत्ता कट?pudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमध्ये आपल्या गटातून इतर आरक्षण पडल्यामुळे अनेक माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य अडचणीत आले आहे. अडचणीत आलेल्या माजी नगरसेवकांची संख्या तब्बल 47 असून, त्यामध्ये भाजपचे 31, राष्ट्रवादी 10, शिवसेनेचे 4, अपक्षांचे 2 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यातील बहुतांश इच्छुकांना आपल्याच प्रभागातील इतर गटातून किंवा दुसऱ्या प्रभागातून नशीब आजमावे लागणार आहे. 78 माजी नगरसेवकांना जैसे थे आरक्षण मिळाले असले तरी त्यांना तिकीट मिळविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.(Latest Pimpri chinchwad News)

भाजपचे 31, राष्ट्रवादीच्या 10; दिग्गजांचा पत्ता कट?
ESI Hospital Pimpri: ईएसआय रुग्णालयात रुग्ण तपासणीकडे दुर्लक्ष; निवृत्त डॉक्टरांकडून औषधोपचारावर भर

महापालिकेच्या एकूण 128 जागांपैकी 92 जागांवर आरक्षण पडले आहे. त्यात एकूण 78 माजी नगरसेवकांच्या जागा सुरक्षित राहिल्या आहेत. तर, 47 माजी नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भाजपाच्या 43 माजी नगरसेवकांच्या जागा सुरक्षित असल्या तरी, 31 जागा अडचणीत सापडल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासच्या 26 माजी नगरसेवकांच्या जागा सेफ झोनमध्ये तर, 10 जागा अडचणीत आहेत. एकसंघ असलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या 5 जागा सुरक्षित आहेत. तर, 4 जागांवरील आरक्षण बदलले आहे. एकूण 5 अपक्षांपैकी 3 जागा सेफ, तर 2 जागा असुरक्षित झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एकमेव जागा सेफ झोनमध्ये आहेत.

जागा असुरक्षित झाल्याने अनेकांना राजकीय पुनर्वसनासाठी धडपड करावी लागणार आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रभागात आणि प्रभागाबाहेरील जागेवर चाचपणी करावी लागणार आहे. प्रभागातील एकमेव खुल्या जागेवर अनेक दिग्गज माजी नगरसेवक एकमेकांच्या समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ‌‘काँटें की टक्कर‌’ पहायला मिळू शकेल; तसेच प्रमुख पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. परिणामी, प्रभागात जोरदार रस्सीखेच पाहण्यास मिळणार आहे. त्या अटीतटीच्या लढतीत अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपचे 31, राष्ट्रवादीच्या 10; दिग्गजांचा पत्ता कट?
Maval Politics: मावळात दे पैठणी घे उमेदवारीचा नवा ट्रेंड!

यांच्या गटातील आरक्षण बदलले

कुंदन गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, नितीन काळजे, सुवर्णा बुर्डे, विकास डोळस, निर्मला जगताप, सागर गवळी, अनुराधा गोफणे, सारिका लांडगे, रवी लांडगे, सीमा साळवे, गीता मंचरकर, राहुल भोसले, केशव घोळवे, मंगला कदम, अश्विनी बोबडे, संजय नेवाळे, पौर्णिमा सोनवणे, कमल घोलप, उत्तम केंदळे, नामदेव ढाके, माधुरी कुलकर्णी, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, शैलेश मोरे, कोमल मेवानी, सुलक्षणा धर, शाम लांडे, विनोद नढे, उषा काळे, अभिषेक बारणे, ॲड. सचिन भोसले, झामाबाई बारणे, अश्विनी वाघमारे, राहुल कलाटे, ममता गायकवाड, तुषार कामठे, सागर आंगोळकर, चंदा लोखंडे, आशा शेंडगे, स्वाती काटे, रोहित काटे, अंबरनाथ कांबळे, माधवी राजापुरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे.

यांच्या गटातील आरक्षण जैसे थे

साधना मळेकर, अश्विनी जाधव, सरिता बोऱ्हाडे, राहुल जाधव, वसंत बोराटे, विनया तापकीर, लक्ष्मण सस्ते, नानी घुले, प्रियंका बारसे, अजित गव्हाणे, यशोदा बोईनवाड, राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, प्रा. सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, ॲड. नितीन लांडगे, नमता लोंढे, विक्रांत लांडे, डॉ. वैशाली घोडेकर, समीर मासुळकर, अनुराधा गोरखे, तुषार हिंगे, योगिता नागरगोजे, एकनाथ पवार, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, पंकज भालेकर, सुमन पवळे, सचिन चिखले, मीनल यादव, वैशाली काळभोर, प्रमोद कुटे, राजू मिसाळ, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, अमित गावडे, बाळासाहेब ओव्हाळ, प्रज्ञा खानोलकर, संगीता भोंडवे, मोरेश्वर भोंडवे, करुणा चिंचवडे, सचिन चिंचवडे, अपर्णा डोके, राजेंद्र गावडे, जयश्री गावडे, शीतल शिंदे, सुजाता पालांडे, योगेश बहल, निकिता कदम, संदीप वाघेरे, उषा वाघेरे, डब्बू आसवानी, नीता पाडाळे, संतोष कोकणे, मनीषा पवार, कैलास बारणे, माया बारणे, नीलेश बारणे, रेखा दर्शले, मयूर कलाटे, आरती चोंधे, संदीप कस्पटे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे, सुनीता तापकीर, चंद्रकांत बारणे, शत्रुघ्न काटे, निर्मला काटे, शीतल काटे, नाना काटे, उषा मुंढे, शशिकांत कदम, राजू बनसोडे, सीमा चौगुले, नवनाथ जगताप, उषा ढोरे, हर्षल ढोरे

भाजपचे 31, राष्ट्रवादीच्या 10; दिग्गजांचा पत्ता कट?
Pimpri Chinchwad Election: आजची आरक्षण सोडत ठरवणार महापालिकेच्या रणसंग्रामाचे समीकरण

या 8 प्रभागात पूर्वीप्रमाणेच ‌‘लॉटरी‌’

जाधववाडी प्रभाग क्रमांक 2, भोसरी गावठाण, गव्हाणेवस्ती प्रभाग क्रमांक 7, मोहनगर, दत्तनगर, काळभोरनगर प्रभाग क्रमांक 14, आकुर्डी, प्राधिकरण, निगडी प्रभाग क्रमांक 15, रावेत, किवळे, मामुर्डी प्रभाग क्रमांक 16, पिंपरीगाव, मिलिंदनगर, जिजामाता रुग्णालय प्रभाग क्रमांक 21, रहाटणी, तापकीरनगर प्रभाग क्रमांक 27 आणि पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 या आठ प्रभागातील आरक्षित जागा फेबुवारी 2017 ला झालेल्या निवडणुकीत होत तसेच आहेत. त्यामुळे या प्रभागातील माजी नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news