Fodder Cultivation For Drought Relief: दुष्काळग्रस्त पशुधनासाठी महापालिकेचा पुढाकार; ४०० एकरांवर चारा लागवड करणार

पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या पडीक जमिनीवर मका व चारा पिकांची लागवड; प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर
Livestock Fodder Crisis
Livestock Fodder CrisisPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांत दुष्काळ निर्माण झाल्याने पाण्यासह जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्मच्या सुमारे चारशे एकर पडीक जागेत चारा लागवड करणार आहे. तो चारा दुष्काळग्रस्त भागांना पुरवण्यात येणार आहे.

Livestock Fodder Crisis
Dehu Indrayani River Ghat: देहूत इंद्रायणी घाटाची पडझड; भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुधनासाठी मदतीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. शहरात पिंपरी येथे संरक्षण विभागाची मिलिटरी डेअरी फार्मची सुमारे ४०० एकर पडीक जमीन आहे. संरक्षण विभागाने तेथील डेअरी काही वर्षांपूर्वी बंद केली आहे. गेल्या वर्षी तेथे झालेल्या धार्मिक सत्संग कार्यक्रमासाठी तो भाग स्वच्छ करून सपाटीकरण करण्यात आले होते. त्या वेळी डेअरी फार्मची इतकी मोठी जागा शहराच्या मध्यभागात असल्याचे शहरवासीयांना समजले. ती जागा चारा लागवडीसाठी महापालिकेस तात्पुरत्या कालावधीसाठी देण्याची मागणी संरक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. चारा लागवड पूर्ण झाल्यानंतर संरक्षण विभागास ती जमीन पूवर्वत करून देण्यात येणार आहे.

Livestock Fodder Crisis
Pimpri Court Employees Strike: पिंपरी न्यायालयातील ६७ कर्मचारी बेमुदत संपावर; न्यायालयीन कामकाज ठप्प

संरक्षण विभागाकडून एनओसी मिळाल्यानंतर जमिनीची मशागत करून लागवडीचे काम सुरू करण्यात येणार आहे. या जमिनीत मका व इतर चारा पिकांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका आपले मनुष्यबळ लावणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पेरणी करण्याचे नियोजन असून, साधारण दोन ते तीन महिन्यांत म्हणजेच मार्च किंवा एप्रिलपर्यंत चारा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तयार होणारा चारा राज्यात सर्वाधिक टंचाई असलेल्या भागांत पाठविण्याचे नियोजन आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार चारा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Livestock Fodder Crisis
Wakad Highway Stunt Video: नवीन कारचा जल्लोष महामार्गावर! रिल्ससाठी तरुणांची धोकादायक स्टंटबाजी

लागवडीसासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणार

चारा लागवड करण्यासाठी संरक्षण विभागाची पडीक जमीन वापरली जाणार आहे. चारा लागवडीसाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर करून चारा उत्पादन केल्याने शहरातील पिण्याच्या पाण्यावर त्याचा भार पडणार नाही. तसेच, दुष्काळी भागात जनावरांना चारा उपलब्ध होणार आहे.

Livestock Fodder Crisis
Love Relationship Stress and Mental Health: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमभंगाचा मानसिक आरोग्यावर परिणाम; दरमहा ७ ते ८ जणांच्या आत्महत्या

दुष्काळग्रस्त भागासाठी महापालिकेचा हातभार

राज्यातील दुष्काळाच्या संकटात महापालिकेकडून मदत व्हावी, म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. उपलब्ध जमीन, प्रक्रिया केलेले पाणी व महापालिकेची यंत्रणा राबवून मोठ्या प्रमाणावर चारा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तो चारा दुष्काळग्रस्त भागाला पुरवण्यात येईल. संरक्षण विभागाकडून एनओसी मिळाल्यानंतर तत्काळ लागवडीचे काम सुरू केले जाणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.