Voter List Ward-Wise: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यास वेग

महापालिकेचे 1 हजार 800 कर्मचारी प्रत्यक्ष प्रभागात जाऊन घर-घर भेट देऊन मतदारांची पडताळणी करत आहेत; पाच नोव्हेंबरपर्यंत प्रारूप यादी तयार होणार
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यास वेग
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यास वेगPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्याचे काम वेगात सुरू आहे. या कामासाठी नेमलेले 1 हजार 800 अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त आहेत. प्रत्यक्ष प्रभागात जाऊन सीमेवरील घरांना भेट देऊन मतदारांची नावांची पडताळणी केली जात आहे. (Latest Pimpri chinchwad News)

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यास वेग
Investigation: चिंचवड खून प्रकरणात नवे धागेदोरे; पत्नीच्या व्यसन आणि कर्जाची चौकशी सुरू

महापालिकेच्या 4 सदस्यीय एकूण 32 प्रभाग आहेत. ती प्रभागरचना 6 ऑक्टोबरला अंतिम होऊन, ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तीन प्रभाग फोडून शेजारच्या प्रभागात तो परिसर जोडण्यात आला आहे. त्यामुळे मतदार संख्येत मोठा बदल झाला आहे. एका प्रभागातील 7 ते 8 हजार मतदार दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे एससी व एसटीच्या जागेतील आरक्षणात बदल झाला आहे. परिणामी, अनेक इच्छुकांसह माजी नगरसेवकांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले हे उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यास वेग
Diwali ST Revenue: दिवाळीत एस.टी.चा धडाका! तीन दिवसांत साडेसात लाख प्रवासी, सहा कोटींचे उत्पन्न

दुसरीकडे, महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्याचे प्रत्यक्ष काम शनिवारी (दि.18) सुरू झाले आहे. त्या कामकाजासाठी प्रगणक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व पर्यवेक्षक असे एकूण 1 हजार 800 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सर्वांना मतदार यादी फोडण्याचे प्रशिक्षण गुरूवारी (दि.17) देण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यास वेग
Municipal Elections: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपूर्वी माजी नगरसेवक झाले ॲक्टिव्ह

त्यासाठी विधानसभा मतदारसंघाची 1 जुलै 2025 ची अंतिम मतदार यादी गृहित धरण्यात आली आहे. शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी तसेच, भोर या चार विधानसभा मतदार संघातील मतदार आहेत. मतदार याद्या महापालिकेला प्राप्त झाल्या असून, प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक प्रगणक व बीएलओंना प्रभागातील मतदान केंद्रातील एका भाग यादीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार, ते काम करीत आहे. त्या भागात समाविष्ट असलेल्या घराची पाहणीही केली जात आहे. तसेच, प्रभागातील सीमेवरील भागांतील मतदारांची बारकाईने तपासणी केली जात आहे. एका प्रभागाचा मतदार दुसऱ्या प्रभागात समाविष्ट होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यास वेग
Municipal Elections BJP vs NCP: महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने; महायुती फुटीचा फायदा महाविकास आघाडीस?

पाच नोव्हेंबरपर्यंत मतदार यादी तयार होणार

प्रभागनिहाय 32 प्रभागाची प्रारूप मतदार यादी 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून 14 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. त्यावर सुनावणी घेऊन 28 नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील शाळांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांचे ठिकाणी निश्चित केली जातील. त्या मतदान केंद्राची अंतिम यादी 4 डिसेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 10 डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यास वेग
Road Traffic Congestion Relief: कासारवाडी ते दापोडी रेल्वे मार्गाजवळ 18 मीटर रस्ता; वाहतूक कोंडी कमी होणार

विधानसभेच्या मतदार याद्या फोडून यादी बनविण्यास सुरुवात

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व 32 प्रभागांची प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी एकूण 1 हजार 800 प्रगणक, बीएलओ व पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. ते सर्व कर्मचारी हे महापालिकेचे आहेत. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत, असे महापालिकेच्या निवडणूक मतदान कक्षाचे सहाय्यक आयुक्त तथा सहाय्यक प्राधिकृत अधिकारी किरणकुमार मोरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news