Road Traffic Congestion Relief: कासारवाडी ते दापोडी रेल्वे मार्गाजवळ 18 मीटर रस्ता; वाहतूक कोंडी कमी होणार

पिंपरी-चिंचवड महापालिका तयार करणार पर्यायी अंतर्गत रस्ता; खर्चास स्थायी समितीची मान्यता
कासारवाडी ते दापोडी रेल्वे मार्गाजवळ 18 मीटर रस्ता
कासारवाडी ते दापोडी रेल्वे मार्गाजवळ 18 मीटर रस्ताPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी पूल ते दापोडी पूल असा रेल्वे मार्गाच्या एका बाजूने 18 मीटर डीपी रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी या तीन भागांसाठी पर्यायी अंतर्गत रस्ता उपलब्ध होणार असल्याने परिसरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे. (Latest Pimpri chinchwad News)

कासारवाडी ते दापोडी रेल्वे मार्गाजवळ 18 मीटर रस्ता
Municipal Corporation Debt: पिंपरी-चिंचवड महापालिकेवर फक्त 560 कोटींचे कर्ज; आर्थिक स्थिती स्थिर

नाशिक फाटा, कासारवाडी पूल ते दापोडी पुलापर्यंत रेल्वे मार्गाच्या बाजूने 18 मीटर रूंद रस्ताचे महापालिकेच्या विकास योजना आराखड्यात आरक्षण आहे. आता, तो रस्ता महापालिकेकडून विकसित करण्यात येणार आहे. कासारवाडी ते दापोडीच्या हॅरिस पुल या मार्गाचे अंतर 2.50 किलोमीटर आहे. वाढती वाहतूक रहदारी लक्षात घेऊन हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे दापोडी, फुगेवाडी व कासारवाडी भागांतील नागरिकांनी पर्यायी अंतर्गत नवा रस्ता उपलब्ध होणार आहे. दापोडी ते निगडी या ग्रेडसेपरेटर मार्गाच्या विरुद्ध बाजूने हा समांतर रस्ता असणार आहे. तो रस्ता लोकवस्तीतून जाणार आहे. या रस्त्यामुळे दापोडी ते निगडी मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

कासारवाडी ते दापोडी रेल्वे मार्गाजवळ 18 मीटर रस्ता
Diwali waste collection: अबब! दिवाळीत पिंपरीत साडेआठ हजार टन कचरा संकलित; पालिकेची तातडीची स्वच्छता मोहीम

खर्चास स्थायी समितीची मान्यता

विभागाकडून सल्लागार नियुक्तीसाठी निविदा 26 जून 2025 ला प्रसिद्ध करून दर मागविण्यात आले होते. त्यात 8 सल्लागारांनी सहभाग घेतला. त्यापैकी चार सल्लागारांनी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या दालनात 4 जुलै 2025 सादरीकरण केले. सर्व सल्लागारांनी तांत्रिक प्रस्ताव 10 जुलैला सादर केले. तांत्रिक छाननीमध्ये चारपैकी 3 सल्लागार पात्र ठरले. त्यात स्वराज इंजिनिअरिंग कन्सल्टंसी या सल्लागार एजन्सीने सर्वांधिक गुण प्राप्त केल्याने त्याची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. त्या एजन्सीला निविदापूर्व 0.50 टक्के आणि निविदा पश्चात 1.18 टक्के असे एकूण 1.68 टक्के शुल्क दिले जाणार आहे. त्या सल्लागार एजन्सीच्या नियुक्तीस तसेच, खर्चास आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

कासारवाडी ते दापोडी रेल्वे मार्गाजवळ 18 मीटर रस्ता
Diwali Fire Incidents: लक्ष्मीपूजनदिवशी पिंपरीत आगीच्या 26 घटना; अग्निशामक दलाची रात्रीभर धावपळ

रेल्वेच्या बाजूने अडीच कि.मी. चा रस्ता तयार करणार

कासारवाडी पूल येथील हिराबाई लांडगे चाळ ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत रेल्वे मार्गाच्या एका बाजूने काही ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला आहे. काही ठिकाणी रस्ता ताब्यात घेणे बाकी आहे. हा रस्ता फुगेवाडी स्मशानमूभी येथून निघतो. या 2.50 किलामीटर अंतराचा 18 मीटर रुंदीचा डीपी रस्ता तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news