Vijay Suryawanshi: महापालिकेत निलंबनाचा धडाका! विजय सूर्यवंशींच्या ७ महिन्यांत ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई

निष्काळजीपणा, गोपनीयतेचा भंग आणि लाचलुचपत कारवाईसह विविध प्रकरणे; अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण
Vijay Suryawanshi
Vijay SuryawanshiPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: महापालिकेत फौजदारी गुन्हा, लाचलुचपत विभागाची कारवाई, कामकाजात हयगय, निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर, प्रशासकीय कामकाजातील गोपनीयतेचा भंग यासह विविध कारणांमुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अवघ्या सात महिन्यात 11 अधिकारी व कर्मचार्‍यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे.

आयुक्ताच्या या कठोर भूमिकेमुळे महापालिका वर्तुळात चर्चा होऊ लागली असून, अधिकारी व कर्मचारी या कारवायांमुळे चांगलेच धास्तावले आहेत.

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या जागी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त म्हणून राज्य शासनाने 11 मार्च 2026 रोजी नियुक्ती केली.

डॉ. सूर्यवंशी यांनी 16 मार्चला आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. महापालिकेत त्यांच्या कार्यकाळात विविध गंभीर प्रकार, चुका अधिकारी व कर्मचार्‍यांकडून घडल्या आहेत. त्यामुळे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी कोणतीही दया माया न दाखवता कायद्यानुसार 11 अधिकारी व कर्मचार्‍यांचे थेट निलंबन करून घरचा रस्ता दाखविला आहे.

Vijay Suryawanshi
Pimpri Chinchwad Diwali Shopping: दिवाळीच्या खरेदीला पिंपरी-चिंचवडमध्ये सुरुवात; मुलांच्या परीक्षांमुळे बाजारपेठांतील गर्दी कमी

दरम्यान, यापूर्वीच्या आयुक्तांच्या संपूर्ण तीन वर्षांच्या कार्यकाळात 11 अधिकारी व कर्मचार्‍यांचे निलंबन झाले नाही. ते आयुक्त सूर्यवंशी यांच्या सात महिन्यांच्या कार्यकाळात 11 जणांचे निलंबन झाले आहे. राजकीय दबावाला बळी न पडता आयुक्तांकडे थेट कठोर कारवाई होत आहे. या कारवायांमुळे अधिकारी व कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.

मुख्य अभियंता, डॉक्टरांपासून बीट निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन

कामकाजात हयगय व निष्काळजीपणा, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आयुक्तांनी पहिली कारवाई स्थापत्य अभियांत्रिकी सहायक शेषेराव अटकोरे आणि प्रशासकीय कामकाजातील गोपनियतेचा भंग केल्यामुळे कनिष्ठ अभियंता संदीप हजारे या दोघांचे एकाच दिवशी म्हणजे 10 एप्रिलला निलंबन केले.

Vijay Suryawanshi
Vadgaon Maval Water Supply: वडगाव मावळमध्ये पाणीटंचाईचे संकट; शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा

एका प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे 20 मे रोजी अभिजीत गायकवाड यांचे निलंबन केले. लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक उमेश लोंढे याचे 15 जूनला निलंबन केले.

मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेप्रकरणी कामकाजात कसुर केल्याबद्दल मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचे 15 जुलैला आणि त्याच प्रकरणी अग्निशमन केंद्र अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांचे 18 जुलैला निलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

जनगणनेच्या कामाच्या वेळेत शिक्षिकेची छेड काढल्यामुळे अनुरेखक दिलीप आडे यांचे 8 सप्टेंबरला, कामकाजातील अनियमितता प्रकरणी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे व उपअभियंता अशोक मोरे यांचे निलंबन करण्यात आले. तर, वायसीएम रूग्णालयात शवविच्छेदन विभागात मद्यपान केल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिकेत बेशिस्तपणा वाढला ?

एकीकडे विविध कारणांमुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 11 अधिकारी व कर्मचार्‍यांचे निलंबन करत कडक भूमिका घेतली आहे. असे असले तरी, ते रुजू झाल्यापासून महापालिकेत अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रशासकीय बेशिस्तपणा, कामचूकारपणा वाढल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

आयुक्त विविध बैठकांसह कामानिमित्त बाहेर असताना अधिकारी व कर्मचारीही स्वतःच्या दालनात, जबाबदारीच्या ठिकाणी उपस्थित नसतात. काही कर्मचारी तर, सकाळी हजेरी लावून गायब होतात. ते सायंकाळी थम्ब करायला पुन्हा महापालिकेत येत असल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे फक्त निलंबनाचा धडाका न लावता आयुक्तांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news