Pimpri Chinchwad LPG Supply Inspection: गॅस टंचाईवर प्रशासनाचे पथक सक्रिय; शहरात साठ्यांची तपासणी

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पथकांची नियुक्ती; गॅस साठा व वितरणाची चौकशी
Food Civil Supplies Department
Food Civil Supplies DepartmentPudhari
Published on
Updated on

पिंपरी: युध्दाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच व्यावसायिक गॅस विकी बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील गॅसधारक आणि वितरकांकडील साठ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात दोन पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Food Civil Supplies Department
LPG Shortage Impact On Houses: गॅस टंचाईने घरांचे बजेट कोलमडले; स्वयंपाक कसा करायचा?

या तपासणीद्वारे गॅसचे योग्य वितरण होत आहे की नाही, याची खात्री करण्यात येणार आहे. गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अनियमितता दिसून येत असल्याने नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तकारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी ग््रााहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

Food Civil Supplies Department
Pimpri Chinchwad LPG Shortage: पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाई; खाद्यतेल व सुकामेवा महाग

काही ठिकाणी गॅससाठा असतानाही ग््रााहकांना उशिरा सिलिंडर देण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तपासणीदरम्यान गॅस वितरकांकडील नोंदी, साठा आणि वितरणाची प्रक्रिया यांची पाहणी केली जाणार आहे. जर कुठेही नियमांचे उल्लंघन किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

Food Civil Supplies Department
Pimpri Chinchwad Municipal Debt: पिंपरी-चिंचवड महापालिकेवर ठेकेदारांसमोर ५२८ कोटींचे दायित्व

युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर गॅस-पेट्रोलवर विनोदी रिल्स व्हायरल

जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या किमती वाढण्याची चर्चा सुरू असतानाच सोशल मीडियावर गॅस आणि पेट्रोलच्या दरांवर आधारित विनोदी रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक युजर्स वाढत्या महागाईवर भाष्य करताना हलक्या-फुलक्या पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

- मी आजच सायकल बुक केली आणि चूल घरी आणली. आता होऊ दे खर्च.

- पूर्वी सोनं खूप महाग आहे असं वाटत होत. आता गॅस सिलेंडर त्याहून महाग वाटत आहे.

- मुलगा ः आई गॅसचा दर पुन्हा वाढला

आई ः आजपासून घरात दोनच पर्याय उपवास आणि बाहेरच खाणं.

- बायको गॅस चालू करायला जाते

नवरा ः थांब थांब इतक्या पटकन गॅस चालू करू नकोस पहिले फोटो काढू आठवण म्हणून.

- घरात सोन्याला नाही सिलिंडरला लॉक लावण्याची आली वेळ.

- चुलीवरच मटण, चुलीवरची खिचडी खायला हॉटेलवर जायचे ना राव तुम्ही, आता घरोघरी चुली पेटवून नाही दाखवल्या तर नाव ट्रम्प तात्या नाही.

असा मजेशीर संवाद असलेले अनेक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या रिल्समधून लोक वाढत्या महागाईवर विनोदाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत असल्याचे दिसून येते.

Food Civil Supplies Department
Aundh District Hospital Patient Death: औंध जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणा; रुग्णाचा मृत्यू

शहरात दोन पथकांची नेमणूक केली आहे. ज्या ठिकाणी गॅसचा साठा करून ठेवला आहे. त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन कुणीही करू नये

डॉ. विजयकुमार क्षीरसागर, परिमंडळ अधिकारी, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news