Pimpri Chinchwad Juvenile Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये बालगुन्हेगारीत घट; विशेष बाल पोलिस पथकाच्या उपक्रमांचा परिणाम

‘संवाद’ उपक्रमांतर्गत 251 बालकांचे समुपदेशन; जनजागृती, क्रीडा व पुनर्वसनामुळे सकारात्मक बदल
Juvenile Crime
Juvenile CrimePudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यरत विशेष बाल पोलिस पथकाने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या विविध प्रतिबंधात्मक व पुनर्वसनात्मक उपक्रमांचा बालगुन्हेगारीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. विधीसंघर्षीत बालकांचे वैयक्तिक समुपदेशन, पालकांशी थेट संवाद, क्रीडा व कौशल्यविकास प्रशिक्षण, शैक्षणिक पुनर्संलग्नता तसेच व्यसनमुक्तीविषयक मार्गदर्शन या बहुआयामी उपाययोजनांमुळे अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. या हस्तक्षेपांमुळे गुन्हेगारीकडे झुकणाऱ्या प्रवृत्तींवर नियंत्रण येऊ लागल्याचा दावा पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Juvenile Crime
Pimpri Underground Tunnel Project: रस्त्यावरील कोंडी दूर करण्यासाठी 32 हजार कोटींचा भुयारी मार्ग प्रकल्प

गुन्ह्यांमध्ये घट

जानेवारी 2026 मध्ये 32 बालकांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. मागील वर्षी सन 2025 मधील जानेवारी महिन्यात हा आकडा 67 होता. या तुलनेत जानेवारी महिन्यातील सहभागात लक्षणीय घट झाल्याचे दिसते. वर्षभराचा आढावा घेतला असता सन 2024 मध्ये विधीसंघर्षीत बालकांवर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांची संख्या 81 होती. ती 2025 मध्ये 78 वर आली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी आणि मारहाण यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे. काही गुन्ह्यांमध्ये घट दिसून येत असली तरी दरोडा आणि मारहाण प्रकरणांत वाढ झाल्याचेही आकडेवारीतून समोर येत आहे.

Juvenile Crime
Navlakh Umbare Crematorium Issue: बधलवाडीत स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित; ग्रामस्थ आक्रमक

शहरात 10 बालस्नेही कक्ष

पीडित तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी शहरात 10 बालस्नेही कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये बालकांची चौकशी संवेदनशील, भीतीमुक्त आणि सन्मानपूर्वक वातावरणात केली जाते. बालमैत्रीपूर्ण सजावट, स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आणि प्रशिक्षित अधिकारी यांमुळे बालकांवरील मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय बालक व महिलांच्या सुरक्षिततेसाठी दापोडी आणि भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत 16 ठिकाणी 83 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चाकण परिसरातील संवेदनशील भागांतही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू असून प्रतिबंधात्मक पावले उचलली जात आहेत.

Juvenile Crime
Lonavala Tourist Rush Traffic: पर्यटकांची वाढती गर्दी; शहरात वाहतूककोंडीची समस्या तीव्र

व्यापक स्वरूपात जनजागृती

बालहक्क दिन सप्ताह आणि पोलिस स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष बाल पोलिस पथकाने शहरातील शाळा, महाविद्यालये, झोपडपट्टी वस्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यापक जनजागृती मोहीम राबविली. रॅली, पथनाट्य, व्याख्याने आणि संवाद सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, शारीरिक तंदुरुस्ती, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि पोक्सो कायद्याची माहिती देण्यात आली. बालकांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहावे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा आणि कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराची तक्रार करण्यास घाबरू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत शिक्षक, पालक व स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग होता.

Juvenile Crime
Pimpri Chinchwad Urban Street Design: अर्बन स्ट्रीट डिझाईन व हरित सेतू प्रकल्प सुशोभिकरण नव्हे; आयुक्त श्रावण हर्डीकर

‌‘संवाद‌’ अंतर्गत विविध पैलूंवर अभ्यास

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली ‌‘संवाद‌’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेल्या 251 विधीसंघर्षीत व व्यसनाधीन बालकांचे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मानसशास्त्रीय मूल्यमापन करण्यात आले. बौद्धिक क्षमता, नैराश्य, चिंताग्रस्तता, व्यसनाधीनता, आत्महत्येची प्रवृत्ती, आक्रमक वर्तन तसेच कुटुंबीय वातावरण अशा विविध पैलूंचा सखोल अभ्यास करण्यात आला. या निष्कर्षांच्या आधारे संबंधित बालकांसाठी नियमित समुपदेशन, आवश्यक वैद्यकीय उपचार, ध्यान-सत्रे, जीवनकौशल्य कार्यशाळा तसेच पालकांचे मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news