Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवड हादरले! सख्ख्या बहिणींवर अत्याचार; 65 वर्षीय नराधमाला पोलिसांनी घातल्या बेड्या

Pimpri Chinchwad POCSO Case: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून 65 वर्षीय नराधमाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
Pimpri Chinchwad Crime
Pimpri Chinchwad CrimePudhari
Published on
Updated on

- तुषार झरेकर, पुढारी न्यूज

Pimpri Chinchwad Crime: सख्ख्या बहिणींवर अत्याचार झाल्यानं पिंपरी चिंचवड शहर हादरलंय. शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय नराधमाने हे कृत्य केलंय. याप्रकरणी रमजान बागवानला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नराधमाने दहा वर्षीय पीडितेवर दीड महिन्यात चार वेळा आणि चार वर्षीय पीडितेवर एकदा अत्याचार केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी नराधमावर पोक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचे आई-वडील, शेजारीचं राहणारे आज्जी-आजोबा आणि काका मजुरी करतात. याचं पीडित कुटुंबाच्या बाजूलाचं राहणारा नराधम, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा हे पण मजुरीचंच काम करतात.

चौथीत शिकणारी दहा वर्षीय पीडिता नेहमीप्रमाणे आज सकाळी आठ वाजता शाळेत गेली. अकरा वाजता ती घरी येईपर्यंत आई-वडील आणि शेजारी राहणारे आज्जी-आजोबा काका असे सगळेच कामावर गेले होते.

शेजारी राहणाऱ्या नराधमाची बायको आणि मुलगा हे पण मजुरी करायला गेले, नराधम मात्र घरीचं थांबला होता. त्यावेळी दहा वर्षीय पीडिता आणि तिची चार वर्षीय बहीण घरातली आवराआवर करत होते.

Pimpri Chinchwad Crime
Mohammad Junaid: CJP आंदोलनात अन्नदान करणारा मोहम्मद जुनैद थेट सुप्रीम कोर्टात; केली मोठी मागणी, नेमकं प्रकरण काय?

दुपारच्या वेळी दहा वर्षीय पीडिता कपडे धुण्यासाठी बाहेर आली, त्यावेळी नराधमाने आजूबाजूला कोणी नाही याची खात्री केली आणि पीडितेचे तोंड दाबून स्वतःच्या घरी घेऊन गेला. हे शेजारच्या एका महिलेनं पाहिलं. ही महिला पीडितेच्या आई-वडील कामावरून कधी येतायेत याची वाट पाहत राहिली. संध्याकाळी ते घरी येण्यापूर्वी नराधमाने अत्याचार करुन पीडितेला सोडून दिलं होतं.

मात्र घरच्यांना सांगितलं तर चाकूने पोट कापेन अशी धमकी या नराधमाने चिमुकल्या पीडितेला दिली होती. मात्र शेजारच्या महिलेने पीडितेच्या आई-वडिलांना गाठलं, दुपारी जे घडलं ते सांगितलं. मग पीडितेच्या आईने विश्वासात घेऊन विचारलं असता, तिने आजचा घडला प्रकार सांगितला.

Pimpri Chinchwad Crime
E20 Petrol Survey: E20 पेट्रोलवर धक्कादायक सर्व्हे; मायलेज घटलं, दुरुस्तीचा खर्चही वाढला, 65 टक्क्यांपेक्षा जास्त लोक विरोधात

इतकंच नव्हे तर मे महिन्यात पहिल्यांदा आणि त्यानंतर तीन वेळा असं एकूण चार वेळा तोंड दाबून नराधम घेऊन गेला अन अत्याचार केला. असं पिडीतीने सांगताच, आईसह कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्याहून धक्कादायक म्हणजे या नराधमाने काही दिवसांपूर्वी चार वर्षीय बहिणीला ही एकदा तोंड दाबून घरी नेले होते, हे सांगितल्यावर तर कुटुंबाला जबर धक्का बसला.

मग कुटुंबाने वाकड पोलीस स्टेशनला जाऊन 65 वर्षीय नराधम रमजान विरोधात फिर्याद दिली, त्यानुसार नराधमावर पोक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तातडीनं नराधमाला बेड्या ठोकल्यात. सध्या पुढील तपास चालू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news