Pimpri Chinchwad High Mast Lights: पिंपरी-चिंचवडमधील हायमास्ट दिवे बंद; सार्वजनिक ठिकाणी अंधार, जाहिरातींच्या फलकांनी खांबही व्यापले

काही दिवे ‘ब्लिंक मोड’वर; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
High Mast Lights
High Mast LightsPudhari
Published on
Updated on

पिंपरी: शहरामध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी चौकाचौकांत, सार्वजनिक ठिकाणी, बसस्थानक, उद्यान परिसरात बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी प्रकाश व्यवस्थेसाठी लावलेले हायमास्ट तसेच पदपथावरील दिवे अनेक ठिकाणी बंद असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच, त्याच विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लटकलेले चित्र आहे. काही ठिकाणी दिवे सतत बंद-चालू होत असल्याने नागरिकांना डोळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

High Mast Lights
Pimpri Chinchwad Footpath Encroachment: पिंपरी-चिंचवडमध्ये पदपथ गायब; अतिक्रमण, पार्किंग अन् दुचाकींच्या वर्दळीने पादचारी त्रस्त

शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांसाठी बाके आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळेत ज्येष्ठ नागरिकांसह अनेक नागरिक या ठिकाणी काही वेळ बसण्यासाठी येतात. मात्र, अनेक ठिकाणी दिवे बंद असल्याने नागरिकांना अंधारात बसावे लागत आहे. काही ठिकाणी हायमास्ट दिव्यांपैकी काही दिवे सुरू तर काही बंद असल्याचे दिसून आले आहे.

High Mast Lights
Pimpri Chinchwad Swine Flu: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा; नव्या ४ रुग्णांची भर, संख्या २३ वर

विशेष म्हणजे, काही ठिकाणी दिवे पूर्णपणे बंद नसून, खराब झाल्याने ‘ब्लिंक मोड’वर असल्याचे निदर्शनास येते. दिवा काही सेकंद सुरू होऊन पुन्हा बंद होणे, पुन्हा सुरू होणे, असा प्रकार सातत्याने सुरू राहत असल्याने त्या ठिकाणी बसलेल्या नागरिकांना डोळ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. रात्रीच्यावेळी अशा पद्धतीने प्रकाशमान होणाऱ्या परिसरात नागरिकांची गैरसोय तर होतेच, शिवाय सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो.

High Mast Lights
Pimpri Chinchwad Worker Compensation: पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या वारसांना मदतीत भेदभाव? महापालिकेचे निश्चित धोरणच नाही

देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष

सार्वजनिक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून प्रकाशव्यवस्था उभारली जाते. मात्र, दिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे नियमित लक्ष दिले जात नसेल, तर ही व्यवस्था नागरिकांच्या उपयोगाची कशी ठरणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवे बसवणे एवढेच प्रशासनाचे काम आहे का, की ते नियमित सुरू आहेत की नाही याची पाहणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे?

High Mast Lights
Pimpri Chinchwad BRT Route: बीआरटी मार्गावरच खासगी वाहनांचा कब्जा; पीएमपीएमएल बसला स्थानकात प्रवेश करताना कसरत

शहरातील चौक, नागरिकांसाठीची बैठक व्यवस्था, उद्यान परिसर आणि स्मशानभूमी परिसर अशा सार्वजनिक ठिकाणी रात्री पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे. त्यामुळे बंद असलेले हायमास्ट दिवे तातडीने सुरू करावेत; तसेच वारंवार बंद-चालू होणाऱ्या दिव्यांची तांत्रिक तपासणी करून त्यांची दुरुस्ती करावी.

दिलीप कुंभार, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news