Pimpri Chinchwad Swine Flu: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा; नव्या ४ रुग्णांची भर, संख्या २३ वर

महिनाअखेरीस रुग्णसंख्येत वाढ; बदलते हवामान आणि पावसामुळे संसर्गाचा धोका वाढल्याचे डॉक्टरांचे मत
Swine Flu H1N1
Swine Flu H1N1Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लू (एच१ एन१) चा प्रादुर्भाव वाढत असून, आता पुन्हा महिनाखेरीस आणखी ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्णसंख्या 23 वर पोहोचली आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.

Swine Flu H1N1
Pimpri Chinchwad Worker Compensation: पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या वारसांना मदतीत भेदभाव? महापालिकेचे निश्चित धोरणच नाही

गेल्या आठवड्यामध्ये २५ ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूचे १९ रुग्ण आढळल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली होती. त्यानंतर आता पुन्हा महिनाअखेरीस ४ रुग्ण आढळले आहेत. तसेच जुलै महिन्यातदेखील स्वाईन फ्लूचे ५ रुग्ण आढळले होते.

Swine Flu H1N1
Pimpri Chinchwad BRT Route: बीआरटी मार्गावरच खासगी वाहनांचा कब्जा; पीएमपीएमएल बसला स्थानकात प्रवेश करताना कसरत

दरम्यान, हवामानातील बदल आणि सततच्या पावसामुळे एच१ एन१ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. ताप, खोकला, घसादुखी अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या महापालिका दवाखान्यात तपासणी करावी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी किंवा श्वसनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Swine Flu H1N1
Ekvira Devi Temple Ropeway Protest: एकवीरा देवी मंदिर परिसरातील समस्यांवर ग्रामस्थ आक्रमक; रोप वे रद्द करण्यासाठी रास्ता रोको

स्वाईन फ्लू हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असून सर्दी, खोकला, घसादुखी, ताप तसेच श्वसनाशी संबंधित विविध लक्षणे आढळू शकतात. वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news