Pimpri Chinchwad Heavy Vehicle Action: पिंपरी-चिंचवाडमध्ये जड वाहनांवर पोलिसांचा दंडाचा ‘हातोडा’; ९ महिन्यांत ९० हजार वाहनांवर कारवाई

अवजड वाहतुकीला प्रवेशबंदी असतानाही नियमांची पायमल्ली; तब्बल ११.९० कोटींचा दंड वसूल
Pimpri Chinchwad Heavy Vehicle Action
Pimpri Chinchwad Heavy Vehicle ActionPudhari
Published on: 
Updated on: 

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपघाताच्या घटना रोखण्यासाठी शहरातील बहुतांश रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी पिंपरी-चिंचवड वाहतूक, शाखेने जड, अवजड वाहनांना प्रवेश मनाई केली आहे. तरीही शहरातील अनेक रस्त्यांवरुन सकाळ, सायंकाळी गर्दीच्या वेळी ही वाहने सुसाट धावत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत असून, त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे.

Pimpri Chinchwad Heavy Vehicle Action
Classical Marathi Language Week: पिंपरी-चिंचवाडमध्ये अभिजात मराठीचा जागर; भाषा घराघरांत, शाळांमध्ये आणि व्यवहारात जगविण्याचा सूर

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान जड व अवजड वाहनांवर केलेल्या ९० हजार ६०६ वाहनांवर कारवाई करत संबंधितांकडून ११ कोटी ९० लाख २४ हजार ७६० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख आहे. शहरालगत असलेल्या तळेगाव आणि भोसरी एमआयडीसी परिसरात औद्योगिक कंपन्यामध्ये वाहननिर्मितीसह विविध उत्पादने बनवली जातात. या कंपन्यांना लागणारा कच्चा माल पुणे- मुंबई महामार्ग, पुणे- नाशिक महामार्ग, पुणे- औरंगाबाद महामार्गे औद्योगिक परिसरात येतो.

Pimpri Chinchwad Heavy Vehicle Action
Pimpri Durgadevi Hill Tree Cutting: पिंपरीच्या दुर्गादेवी टेकडीवर वृक्षतोडीचा प्रकार; पर्यावरणप्रेमी संतप्त, चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि सायकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी घातली आहे. अवजड वाहनामुळे वाहतुकीची कोंडी होऊन दूरपर्यंत रांगा लागतात. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिस शाखेने आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध मार्गांवर सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. मात्र, प्रतिबंधित वेळेतही जड वाहने धावत असून, यामध्ये मोठे ट्रक, ट्रेलर यासह इतर जडवाहनांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान २०२६ या कालावधीत ९० हजार ६०६ जड व अवजड वाहनांवर कारवाई करत संबंधित वाहनधारकांकडून ११ कोटी ९० लाख २४ हजार ७६० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Pimpri Chinchwad Heavy Vehicle Action
Pimpri Chinchwad Open Gym: पिंपरी-चिंचवडमध्ये १८७ ओपन जिम; कुठे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तर कुठे उपकरणे धूळ खात

अवजड वाहने ठरताहेत धोकादायक

पुणे-मुंबई महामार्ग, मुंबई-बंगळूर महामार्ग, चाकण- तळेगावमार्ग यांसह इतरही मार्गालगत अनेक चालक त्यांची वाहने रस्त्यावरच उभी करतात. इंडिकेटर, पार्किंग लाइट सुरू नसल्यास ही वाहने रात्री नजरेस पडत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांना इतर वाहने धडकूनही अपघात घडतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई केली.

पर्यायी रस्त्यांची रुंदी कमी तासनतास रांगा

मुंबई, ठाणे, तळेगाव आणि लोणावळा शहरांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. सर्व ठिकाणी बंदीच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रत्येक शहराच्या प्रवेशद्वाराजवळ थांबणे भाग पडते. अनेक ठिकाणी पर्यायी रस्त्यांची रुंदी कमी असल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. परिणामी त्यांना तासंतास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यात दुचाकीस्वार शॉटकर्ट शोधतात, त्यात अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे इंधन आणि वेळ दोन्ही वाया जाते.

Pimpri Chinchwad Heavy Vehicle Action
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवाडमध्ये सव्वाआठ महिन्यांत ६०९ जणांचा मृत्यू; आत्महत्येमागचे अनेक प्रश्न अनुत्तरित

बंदी हा एकमेव पर्याय

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. वाहनाची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. नवीन रस्ते, रस्त्यांवरचे अतिक्रमण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे, पर्यायी व्यवस्था उभारणे यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. तळेगाव, चाकण, रांजणगाव, सुपा, नगर आणि औरंगाबादमध्ये महाराष्ट्र, औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्र विकसित झाले आहे. या सर्व एमआयडीसींमध्ये तयार होणारा पक्का माल मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानाने विदेशात निर्यात केला जातो. मुंबईला जाण्यासाठी पुणे- नगरमार्गे, शिक्रापूर मार्ग, वाहने मुंबईला जातात.

या वेळेत अवजड वाहतुकीला बंदी

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत जड-अवजड वाहनांना सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

अवजड वाहनांना ठराविक वेळेत शहरातून प्रवासास मनाई आहे. अनेक वाहनचालक या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन करतात. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाईची मोहीम राबविली जाते. अशा वाहनधारकांकडून जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ११ कोटी ९० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विवेक पाटील, पोलिस उपायुक्त वाहतूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news