Classical Marathi Language Week: पिंपरी-चिंचवाडमध्ये अभिजात मराठीचा जागर; भाषा घराघरांत, शाळांमध्ये आणि व्यवहारात जगविण्याचा सूर

‘मराठी भाषेचा प्रवास’ परिसंवादात भाषेच्या समृद्ध परंपरेचा उलगडा; बोलीभाषा हीच मराठीच्या वैभवाची जिवंत मुळे
Classical Marathi Language Week
Classical Marathi Language WeekPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हा या प्रदीर्घ भाषिक परंपरेवर उमटलेला गौरवाचा शिक्का आहे. मात्र, हा गौरव केवळ उत्सव व सोहळ्यांमध्ये न राहता मराठीला घराघरांत, शाळांमध्ये, प्रशासनात, ज्ञान-विज्ञानात, तंत्रज्ञानात आणि दैनंदिन व्यवहारात जगविणे हीच आजची खरी जबाबदारी आहे, असा सूर मराठी भाषेचा प्रवास या विषयावरील परिसंवादातून उमटला.

Classical Marathi Language Week
Pimpri Durgadevi Hill Tree Cutting: पिंपरीच्या दुर्गादेवी टेकडीवर वृक्षतोडीचा प्रकार; पर्यावरणप्रेमी संतप्त, चौकशीची मागणी

महापालिकेच्या वतीने आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या तिसर्‍या दिवशी मंगळवार (दि. ६) आचार्य अत्रे रंगमंच येथे या परिसंवाद झाला. प्रकाश निर्मळ, कैलास भैरट, प्रा. कल्पना क्षीरसागर, प्रदीप कदम व निवृत्त शिक्षक श्रीकांत चौगुले यांनी मराठीच्या आदिम प्रवाहापासून आजच्या बदलत्या भाषिक वास्तवापर्यंत विविध पैलूंवर विचार मांडले. मराठी ही एखाद्या एका प्रवाहातून निर्माण झालेली भाषा नाही, विविध भाषिक प्रवाहांनी तिच्या काठांना स्पर्श केला. त्या प्रत्येक स्पर्शाने तिच्या शब्दसंपदेत नवे रंग भरले. प्राचीन प्रस्तरलेखापासून गाथा सप्तशती, संत साहित्य आणि आधुनिक मराठी साहित्यापर्यंत तिच्या विकासाचे अनेक पदर उलगडत जातात. लोकजीवनातील म्हणी, वाक्प्रचार, ओव्या आणि बोलीभाषांनी या भाषेच्या मुळांना लोकसंस्कृतीची घट्ट माती दिली आहे, असे वक्त्यांनी अधोरेखित केले.

Classical Marathi Language Week
Pimpri Chinchwad Open Gym: पिंपरी-चिंचवडमध्ये १८७ ओपन जिम; कुठे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तर कुठे उपकरणे धूळ खात

मराठीच्या वैभवाचा खरा ठेवा तिच्या बोलीभाषांच्या पदरात जपला गेला आहे. मालवणी, वर्‍हाडी यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून उमटणार्‍या असंख्य बोलींनी प्रमाण मराठीला शब्दांची श्रीमंती, लयीची गोडी, म्हणी-वाक्प्रचारांची धार आणि लोकसंस्कृतीचा सुगंध दिला आहे. त्यामुळे बोलीभाषा या प्रमाण मराठीच्या सावलीत उभ्या असलेल्या स्वतंत्र वाटा नसून, तिच्या समृद्धीच्या मुळाशी असलेले जिवंत झरे आहेत, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

चिखली टाऊन हॉल येथे बालनाट्य, अभंग-भक्तिगीत

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ग्रीझीच्या दुनियेत चिंटूची धमाल या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या बालनाट्याला महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाटकातील विनोदी प्रसंग, ग्रीझी अस्वल आणि चिंटू यांच्यातील धमाल जुगलबंदी, मजेदार गाणी आणि नृत्य यामुळे संपूर्ण वातावरणात उत्साहाचे रंग भरले. बालनाट्यातील ग्रीझी अस्वल आणि चिंटू या प्रमुख व्यक्तिरेखांभोवती रंगणारे प्रसंग विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरले. विनोद, गंमत, गाणी आणि नृत्याची सांगड घालत सादर करण्यात आलेल्या प्रसंगांमुळे विद्यार्थ्यांचा नाटकातील सहभागही वाढला. वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी उभारण्यात आलेले भव्य आणि रंगीत नेपथ्य. बालमनाला आकर्षित करणार्‍या रंगसंगती आणि दृश्यरचनेमुळे नाटकातील कल्पनाविश्व अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले. त्यासोबतच गाणी आणि नृत्याच्या सादरीकरणामुळे नाटकाला मनोरंजनाची अधिक रंगत आली.

Classical Marathi Language Week
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवाडमध्ये सव्वाआठ महिन्यांत ६०९ जणांचा मृत्यू; आत्महत्येमागचे अनेक प्रश्न अनुत्तरित

भक्तिगीतांचा भक्तिमय स्वरप्रवास

ज्ञानेश्वर मेश्राम, गायिका कल्याणी देशपांडे व सहकार्‍यांनी अभंगवारी कार्यक्रम सादर केला. अभंग आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून भक्तिरसाची अनुभूती देणार्‍या या सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संतपरंपरेतील अभंग, भक्तिगीते आणि त्यातून व्यक्त होणारी अध्यात्मिक भावना यामुळे कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभले.

खळखळून हसले प्रेक्षक

संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकाचे सादरीकरण झाले. हास्यविनोदापासून सामाजिक आणि वैचारिक आशयापर्यंत मराठी रंगभूमीचे विविध पैलू या नाटकातून रसिकांना अनुभवता आला. हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकातून दोन कुटुंबांमधील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नाच्या गडबडीतून निर्माण होणारा विनोद रंगमंचावर खुलला. पात्रांच्या वेगवेगळ्या शारीरिक अडचणी आणि वैशिष्ट्यांमधून निर्माण होणारे गैरसमज, प्रसंग आणि संवाद यामुळे नाटकाला धमाल विनोदाची रंगत लाभली.

Classical Marathi Language Week
Lonavala Crime: लोणावळ्यात आजोबांनी नातवावर रायफल झाडली; गोळीबारात तरुणाचा मृत्यू

उलगडला परंपरेचा प्रवास

लोकजागरच्या वतीने सादर करण्यात आलेल्या सणयात्रा कार्यक्रमातून मराठी पंचांगानुसार येणार्‍या विविध सणांची वैशिष्ट्ये, त्यामागील परंपरा आणि त्यांच्याशी जोडलेल्या कथा रसिकांसमोर उलगडण्यात आल्या. महाराष्ट्राच्या समृद्ध सणपरंपरेचा सांस्कृतिक वारसा सांगत, प्रत्येक सणाशी संबंधित परंपरा आणि त्यामागील कथांना नृत्य व संगीताची सुरेल साथ देण्यात आली.

बुधवारी होणारे विविध कार्यक्रम

  • प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

दुपारी 12.30 : फोक लावणी ( प्रवेश केवळ महिलांसाठी), सायंकाळी 5.30 : भाऊ कदम अभिनीत 'पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची' हे विनोदी नाटक, रात्री 9.30 : स्वर मराठी मनाचा

  • नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, नवी सांगवी

दुपारी 12.30 : लावण्यरंग लावणी कार्यक्रम (प्रवेश केवळ महिलांसाठी), सायंकाळी 5 : गझलभाव कार्यक्रम, रात्री 8 : स्वप्नील जोशी, विदुला चौगुले अभिनीत लग्नपंचमी नाटक

  • आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी

सकाळी 10 : कविसंमेलन, दुपारी 12.30 : गंध मराठी कलेचा, दुपारी 3 : मराठी साहित्याचे विश्व या विषयावरील चर्चासत्र, सायंकाळी 5.30 : शाहिर प्रकाश ढवळे व सहकार्‍यांचा शाहिरी पोवाडा

  • ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी

सकाळी 9 : महापालिका शाळांअंतर्गत समूह नृत्य स्पर्धा, सायंकाळी 7 : लोकगायक नंदेश विठ्ठल उमप यांचा लोककला सोहळा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news