Pimpri Chinchwad Rain Update: पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार पाऊस; रस्ते जलमय, पवना धरण २१ टक्क्यांवर

सलग तीन दिवस पावसाची हजेरी; शहरातील सखल भागात पाणी साचले, नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना
Rain Update
Rain UpdatePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात शनिवार (दि. ४) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. गेले सलग तीन दिवसांपासूण सुरू असलेल्या पावसाने शहर परिसरातील सखल भागात पाणीच पाणी केले. पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळीदेखील वाढली आहे. त्यामुळे शहरातील केजुदेवी आणि रावेत बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत होते. गेल्या २४ तासांत ३७ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

Rain Update
PCMC Financial Crisis: पिंपरी-चिंचवड महापालिकेत आर्थिक गोंधळ; कोट्यवधींच्या उधळपट्टीवर गंभीर प्रश्नचिन्ह

शुक्रवारी दिवसभर तसेच शनिवारीही सुरू असलेल्या संततधारेमुळे चाकरमान्यांची कामाचे ठिकाण गाठताना मोठी धावपळ झाली; तसेच सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांचीदेखील मोठी धांदल उडाल्याचे चित्र होते. तसेच शाळा सुटतानादेखील विद्यार्थ्यांना भिजत घरी जावे लागले. पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

Rain Update
Pawana Closed Water Pipeline Project: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकऱ्यांना दिलासा

शहर परिसरात दिवसभर पावसाच्या सरींनी बरसणे सुरूच ठेवले होते. गेले दोन महिने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना सलग तीन दिवसांच्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे; मात्र असे आल्हाददायक वातावरण असताना शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची वाट लागली आहे. तात्पुरती मलमपट्टी केल्याने खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला होता.

Rain Update
Bhosari Storm Water Chamber Accident: भोसरीत स्टॉर्म वॉटर चेंबरमध्ये दुचाकी अडकली; महिला-मुलाचा बचाव

अनेक ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पाणी साचलेल्या भागातून जाताना दुचाकी बंद पडल्याच्या घटनाही घडल्या. पाऊस आणि गारठा यामुळे नागरिकांनी चहा, कॉफीसारखे गरम पेय घेऊन आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. संततधार पावसामुळे अनेकांचे कामानिमित्त तसेच खरेदीसाठी घराबाहेर पडण्याचे बेत रद्द झाले. शनिवारची सुटी असली तरी नागरिकांनी घरात राहणे पसंत केले.

Rain Update
Dehugaon Palkhi Route Road Condition: देहूगाव पालखी मार्गाची दयनीय अवस्था; वारकरी संतप्त

पवना धरणात २१ टक्के साठा

मावळातील पवना धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. धरणात पाणीसाठा वाढू लागल्याचे सकारात्मक चित्र आहे. शनिवार (दि. ४) सायंकाळी पाचपर्यंत धरणातील पाणीसाठा वाढून तो २१ टक्के इतका झाला आहे. गेले तीन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुका परिसरात पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. पवना धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत एकूण ३६० मिलीमीटर पाऊस पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news