Pimpri Chinchwad Eid Milad Traffic: ईद-ए-मिलादनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठे बदल; १२ तास मार्ग बंद, पर्यायी मार्गांचा वापर करा

बुधवारी दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत निर्बंध; पिंपरी, निगडी, चिखलीसह विविध भागांतील वाहतूक वळवली
Traffic Police
Traffic Police Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: ईद-ए-मिलादनिमित्त बुधवार (दि. २६) पिंपरी-चिंचवड शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील विविध मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.

Traffic Police
Pimpri Chinchwad Minor Road Accidents: पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीनांच्या हातात दुचाकी जीवघेणी; ३२ महिन्यांत ५५ जणांचा अपघाती मृत्यू

मिलिंदनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे पिंपरी येथील पीएमपीएमएल मैदानापर्यंत मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पिंपरी, भोसरी, निगडी, कासारवाडी, काळेवाडी, चिंचवड, नेहरूनगर आणि वाकड परिसरातून नागरिक या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. पीएमपीएमएल मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Traffic Police
ST Bus Rent Hike: एसटी बस भाड्यात मोठी वाढ; शाळा-महाविद्यालयांच्या सहलींसाठी ५० टक्के सवलत कायम

मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

Traffic Police
Private Vehicles Police Logo: खासगी वाहनांवर ‘पोलिस’ नाव-लोगो वापरणाऱ्यांना दणका; २३ वाहनचालकांकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

..असे आहेत वाहतूक बदल

  • महावीर चौक, चिंचवड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. नाशिक फाटा, इंदिरा गांधी पूल, नेहरूनगर चौक, जयमल्हार खानावळ चौक, साईन्स पार्क, क्रोमा शोरूम आणि डॉ. आंबेडकर चौक येथे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

  • निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सेंट्रल चौक ते भक्ती-शक्ती चौक तसेच अंकुश चौक, भक्ती-शक्ती चौक, टिळक चौक, स्वानंद डेअरी चौक आणि इतर मार्गांवरील वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

Traffic Police
Pimpri School Complaint Box: तक्रार पेट्या बसवल्या; मात्र तक्रारींची दखलच नाही! शाळा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे पालक नाराज
  • चिखली वाहतूक विभागाच्या हद्दीत कृष्णानगर चौक ते चेरी चौक, जाधव सरकार चौक ते चेरी चौक, चिखली गाव चौक ते डायमंड चौक आणि पिंगळे चौक ते पाटीलनगर पंप या मार्गांवरही वाहतुकीत बदल राहणार आहेत. चिखली परिसरातील काही मार्गांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध राहणार आहेत.

  • पिंपरी, निगडी आणि चिखली वाहतूक विभागाच्या हद्दीत मिरवणूक पुढे जाईल, त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news