Private Vehicles Police Logo: खासगी वाहनांवर ‘पोलिस’ नाव-लोगो वापरणाऱ्यांना दणका; २३ वाहनचालकांकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांची कारवाई; पोलिस असल्याचा धाक दाखवून गैरवापर होण्याची शक्यता
Private Vehicles Police Logo
Private Vehicles Police LogoPudhari
Published on
Updated on

पिंपरी: खासगी वाहनांवर परवानगीशिवाय पोलिस असा मजकूर, चिन्ह, स्टीकर लावणे कायद्याने गुन्हा जरी असला तरी, पिंपरी चिंचवड शहरात काही वाहनचालक असा मजकूर वापरत असल्याचे निर्देशनास येत आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लघंन होत आहे. वाढते प्रकार निर्देशनास येताच वाहतूक पोलिसांनी या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात पोलिस नाव किंवा लोगाेचा वापर केलेल्या २३ वाहनचालकांवर कारवाई करत ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Private Vehicles Police Logo
Pimpri School Complaint Box: तक्रार पेट्या बसवल्या; मात्र तक्रारींची दखलच नाही! शाळा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे पालक नाराज

अनेक खासगी वाहनचालक आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर पोलिस असे स्टीकर लावतात. नियमांनुसार पोलिस विभागाचे अधिकृत बोधचिन्ह, चिन्हे किंवा पोलिस हा शब्द केवळ अधिकृत पोलिस वाहने किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी असलेल्या वाहनांनाच वापरण्याची परवानगी आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक खासगी वाहनचालक पोलिस विभागाशी संबंधित बोधचिन्हे लावून शहरात सर्रापणे वाहने चालवत असल्याचे दिसत आहे. मात्र अशा वाहनांचा गुन्हात गैरवापर होण्याची शक्यता नकारता येत नाही. या वाहनांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

Private Vehicles Police Logo
Best Before Sweets: मिठाईचा चकचकाट, पण ताजेपणाचा पत्ता नाही! ‘बेस्ट बिफोर’वर प्रश्नचिन्ह

काय सागंतो कायदा..

कायदा १९५० नुसार, पोलिस बोधचिन्हाचा वापर कोणत्याही व्यापारी, व्यावसायिक किंवा जाहिरातीच्या उद्देशाने करता येत नाही. खासगी वाहनांवर नामफलक, स्टीकर, व चिन्हे लावली असल्यास त्या वाहनांवर मोटार वाहन आधिनियम १९८८ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार परिवहन विभागात वाहतूक पोलिसांचे आहे.

Private Vehicles Police Logo
Akurdi Nigdi Garbage Problem: आकुर्डी-निगडीत कचऱ्याचे साम्राज्य; डासांचा उपद्रव वाढला, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पोलिस असल्याचा धाक..

अशा वाहनांचा अवैध कामांसाठी तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वापर होत आहे. तसेच, पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी असलेल्या व्यक्तीच्या मुलांच्या, नातेवाइकांच्या वाहनांवरही असे लोगाे आणि नाव लावल्याचे प्रकार आढळतात. पोलिस नावाचा धाक दाखवून प्रवासी वाहनांचा वापर होत असल्याचा तक्रारी आहेत. नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि वाहन तपासणीदरम्यान अशा वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे असे प्रकार वाढत आहे.

Private Vehicles Police Logo
Pimpri Vegetable Prices: पावसाचा भाज्यांच्या दरावर परिणाम; पिंपरीत गाजर ६०, लसूण २५० तर आले २०० रुपयांवर

पोलिसांचे बोधचिन्ह, खासगी वाहनावर लावण्याची परवानगी नाही. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे. ऑगस्ट महिन्यात २३ वाहनचालकांवर कारवाई करत ११ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news