ST Bus Rent Hike: एसटी बस भाड्यात मोठी वाढ; शाळा-महाविद्यालयांच्या सहलींसाठी ५० टक्के सवलत कायम

पर्यटन, लग्नसमारंभ, धार्मिक यात्रा व खासगी कार्यक्रमांसाठी बस भाड्यात प्रतिकिलोमीटर २० रुपयांपर्यंत वाढ
ST Bus
ST Buspudhari photo
Published on
Updated on

पिंपरी: एसटी महामंडळाकडून पर्यटन, लग्नसमारंभ, धार्मिक यात्रा व खासगी कार्यक्रमासाठी एसटी बस भाड्याने दिली जाते. यामध्ये महामंडळाने प्रति किमी २० रुपयापर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसोबत सामाजिक कार्यक्रमांसाठी एसटी बुक करणाऱ्यांना होणार आहे.

ST Bus
Private Vehicles Police Logo: खासगी वाहनांवर ‘पोलिस’ नाव-लोगो वापरणाऱ्यांना दणका; २३ वाहनचालकांकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

एसटीच्या एकेरी फेरीसाठी तब्बल ३० ते ३५ टक्क्यांहून अधिक दराने दर आकारणी केली जाणार आहे. याशिवाय किमान आकारणी, बस रद्द करण्याचे शुल्क, मुक्कामाचा दंड आणि अनामत रकमेच्या नियमांतही बदल करण्यात आले आहेत. मात्र, शैक्षणिक संस्थांना सहलींसाठी मिळणारी ५० टक्के सवलत पुढेही कायम ठेवण्यात आली आहे.

ST Bus
Pimpri School Complaint Box: तक्रार पेट्या बसवल्या; मात्र तक्रारींची दखलच नाही! शाळा व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे पालक नाराज

नियमित प्रवासी भाडेवाढ झाल्यानंतर आता प्रासंगिक कराराच्या दरांमध्येही त्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. लग्न समारोह, धार्मिक यात्रांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने एसटी आरक्षित करता येते. तसेच शाळा-महाविघालयांच्या सहलींसाठी ५० टक्के सवलत कायम आहे.

ST Bus
Best Before Sweets: मिठाईचा चकचकाट, पण ताजेपणाचा पत्ता नाही! ‘बेस्ट बिफोर’वर प्रश्नचिन्ह

पर्यटन, लग्नसमारंभ, धार्मिक यात्रा व खासगी कार्यक्रमासाठी एसटी भाड्याने दिली जाते. महामंडळाने यामध्ये सध्या प्रति किमी २० रुपयापर्यंत वाढ केली आहे.

वैशाली काबंळे, आगार प्रमुख, वल्लभनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news