Dahi Handi Accident: दहीहंडीसाठी लावलेल्या डीजेचा स्पीकर अंगावर पडून पिंपरी- चिंचवडमध्ये महिलेचा मृत्यू

Juni Sangvi Vighnaharta Dahi Handi Mandal: जुनी सांगवीतील विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाच्या कार्यक्रमस्थळी दुर्घटना; मंडळ नोंदणीकृत नसल्याची माहिती, पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
PCMC Dahi Handi Accident News
PCMC Dahi Handi Accident NewsPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: दहीहंडी उत्सव संपल्यानंतर डीजेचे साऊंड सिस्टम उतरविताना लोखंडी अँगलसह स्पीकर अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. जुनी सांगवी येथील विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाच्या कार्यक्रमस्थळी शुक्रवारी (दि. ४) रात्री पावणेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मात्र, मृत महिलेच्या नातेवाईकांनी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगत गुन्हा दाखल न करण्याची विनंती केली. दरम्यान, सांगवी पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

PCMC Dahi Handi Accident News
Nigdi Chakan Metro: निगडी-चाकण मेट्रोला पुन्हा ‘ब्रेक’; उपसूचनांनंतरच डीपीआरला अंतिम मंजुरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमा आणि त्यांचे पती सलाउद्दीन हे विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर दोघे तेथून निघाले. त्याचवेळी मंडळाचे कार्यकर्ते डीजेसाठी लावलेले साऊंड सिस्टम उतरवत होते. यादरम्यान, स्पीकर लोखंडी अँगल खाली कोसळून तो सलमा यांच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत सलमा गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने औंध येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

PCMC Dahi Handi Accident News
Lonavala Dahi Handi: लोणावळ्यात दहीहंडीचा थरार; यंदाही तीन मानाच्या हंड्या, गोविंदा पथके सज्ज

मंडळाविरुद्ध काही करू नका

मृत सलमा यांचा मुलगा इरफान पठाण (वय २०) हा विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाचा कार्यकर्ता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दुर्घटनेनंतर इरफान याने आपली तसेच वडिलांची मंडळाविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच पोलिसांनीही स्वतःहून मंडळाविरोधात कारवाई करू नये, अशी विनंती केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ अकस्मात मृत्यूची नोंद केली.

PCMC Dahi Handi Accident News
Talegaon Dabhade Ganeshotsav: तळेगाव दाभाडेचा गणेशोत्सव डीजेमुक्त होणार?; पोलिस उपायुक्त श्वेता खेडकरांचे मंडळांना आवाहन

मंडळच नोंदणीकृत नाही

विघ्नहर्ता दहीहंडी मंडळ नोंदणीकृत नसल्याची माहितीही समोर आली आहे. मंडळ मागील काही वर्षांपासून दहीहंडी उत्सव साजरा करीत आहे. यंदाच्या कार्यक्रमासाठी मंडळाने सांगवी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यावेळी पोलिसांनी तब्बल ४१ अटी व शर्तींची नोटीस बजावून कार्यक्रमाला परवानगी दिली होती.

PCMC Dahi Handi Accident News
Pimple Gurav Stray Dogs: पिंपळे गुरवच्या राजमाता जिजाऊ उद्यानात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; मॉर्निंग वॉकला नागरिक भयभीत

पोलिसांच्या अटींना केराची टोपली?

कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा स्टेज मजबूत असावा, १४ वर्षांखालील गोविंदांचा सहभाग नसावा, वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच ध्वनिप्रदूषण होणार नाही, अशा विविध ४१ अटी पोलिसांनी घातल्या होत्या. मात्र, मंडळाने डीजे साउंड सिस्टिम आणि लेझर लाईटचा वापर करून कार्यक्रम साजरा केल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे नेमके कितपत पालन झाले, स्टेज आणि कमानीच्या सुरक्षिततेची तपासणी कोणी केली आणि कार्यक्रम संपल्यानंतर कमान उतरविण्याचे काम कोणाच्या देखरेखीखाली सुरू होते, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

मृत महिलेचा मुलगा संबंधित मंडळाचा कार्यकर्ता आहे. त्यांची घटनेबाबत कोणतीही तक्रार नाही संबंधित मंडळ नोंदणीकृत नाही. कार्यक्रमाची परवानगी घेण्यासाठी ते आले असता त्यांना अटी व शर्तींची नोटीस देण्यात आली होती.

जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news