Lonavala Crime: लोणावळ्यात आजोबांनी नातवावर रायफल झाडली; गोळीबारात तरुणाचा मृत्यू

कौटुंबिक वादातून भुशीतील हॉटेलमध्ये थरार; सीसीटीव्ही, डीव्हीआर लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पाच जणांवर गुन्हा
Lonavala Shooting Case
Lonavala Shooting CasePudhari
Published on: 
Updated on: 

लोणावळा: लोणावळा शहरातील भुशी गावच्या हद्दीत असलेल्या मोतीराम हॉटेलमध्ये कौटुंबिक वादातून आजोबांनी आपल्याच नातवावर परवानाधारक रायफलमधून गोळी झाडून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिव्हीआर (DVR) लपविल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Lonavala Shooting Case
Pavana River Pollution: थेरगावातील पवना नदीपात्रात पांढऱ्या फेसाचे थर; सांडपाणी सोडल्याचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास भुशी येथील मोतीराम हॉटेलमध्ये ही घटना घडली. मोतीराम रावजी मराठे (वय ८३ वर्षे) याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून आपल्याकडे असलेल्या परवानाधारक १२ बोअर रायफलमधून नातू ॲड. अभय माणिक मराठे (वय ३२ वर्षे, रा. घर क्र. ४, तुळसा निवास, भुशी, लोणावळा) याच्यावर गोळी झाडली. यामध्ये अभय मराठे याचा जागीच मृत्यू झाला.

Lonavala Shooting Case
Pimpri Chinchwad Illegal Construction: पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांना आळा; सदनिका-गाळ्यांच्या खरेदी-विक्रीवरच ‘ब्रेक’

सीसीटीव्ही आणि डिव्हीआर गायब करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

घटनेनंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आणि घटना दडपण्यासाठी मयताचे चुलते हिरामण मोतीराम मराठे (वय ५४ वर्षे), चुलत भाऊ मनोज हिरामण मराठे (वय ३२ वर्षे), कविता हिरामण मराठे (वय ५० वर्षे) आणि हिरामण यांची बहीण राजश्री दशरथ पवार (वय ५८ वर्षे) यांनी आपसात संगनमत केले. आरोपींनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज असलेला डिव्हीआर व कॅमेरे काढून ते अज्ञात ठिकाणी लपवून ठेवले.

Lonavala Shooting Case
Lonavala Traffic Police Action: लोणावळ्यात फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश बुलेटवर पोलिसांचा दणका; ३९ वाहनांवर कारवाई

पोलीस उपनिरीक्षकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सदानंद सावंत (वय ३६) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) मोतीराम रावजी मराठे, २) हिरामण मोतीराम मराठे, ३) मनोज हिरामण मराठे, ४) कविता हिरामण मराठे आणि ५) राजश्री दशरथ पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), २३८, २४१, ३(५) सह आर्म ॲक्ट कलम ३, २७(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Lonavala Shooting Case
ST Parcel Service: एसटीची पार्सल सेवा तीन महिन्यांपासून ठप्प; व्यापारी, नागरिकांची गैरसोय

घटनेची नोंद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news