PCMC Regional Office Restructuring: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठा फेरबदल; 10 क्षेत्रीय कार्यालये व 272 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

प्रशासकीय रचनेत बदल; बांधकाम परवानगी विभागासह अनेक महत्त्वाच्या पदांमध्ये नवी नियुक्ती
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आठचे दहा क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या फेररचनेमुळे तब्ब 272 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये लिपिक, मुख्य लिपिक, कनिष्ठ अभियंते, उपअभियंते यांचा समावेश आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Housing Society Waste Rules: पिंपरी-चिंचवडमध्ये सोसायट्यांवर कचरा नियमांची सक्ती; एसटीपी-कंपोस्ट बंधनकारक

या बदल्यांमध्ये 75 कनिष्ठ अभियंते, 36 उपअभियंते, 103 लिपिक आणि 58 मुख्य लिपिकांचा समावेश आहे. या निर्णयामुळे क्षेत्रीय कार्यालयांपासून ते तांत्रिक व प्रशासकीय शाखांपर्यंत कामकाजाचा नवीन रचना तयार होणार आहे. त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri School Fire Safety Certificate: पिंपरी-चिंचवडमधील 650 शाळांना फायर सर्टिफिकेटसाठी नोटीस

महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार 8 क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून आता दहा क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यात आले आहेत. एक जुलैपासून दहा क्षेत्रीय कार्यालयांनुसार कामकाज सुरू होणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार उर्वरित कर्मचार्‍यांच्याही बदल्या टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pune Nashik Highway Traffic Congestion: पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडीवर तोडगा रखडला; २७ हजार कोटींचा कॉरिडॉर प्रकल्प अडचणीत

पूर्वी होती त्याच ठिकाणी अ ते ह क्षेत्रीय कार्यालयांचे कार्यालय असणार आहेत. नव्याने झालेले ज क्षेत्रीय कार्यालय हे ताथवडे येथील महापालिकेच्या वाहनतळ इमारतीमध्ये असणार आहेत. तर, ल क्षेत्रीय कार्यालय पिंपरी येथील संत तुकारामनगर पोलिस ठाण्यासमोरील म्हाडाच्या इमारतीमध्ये सुरू होणार आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
High Risk Pregnancy Screening: सांगवीत पीएमएसएमए शिबिरातून १७५ ‘हाय-रिस्क’ मातांचा शोध

बांधकाम परवानगी विभाग मनोज सेठियांकडे

शहर अभियंता मकरंद निकम यांनी 28 फेब्रुवारीला सेवानिवृत्ती घेतली आहे. तेव्हापासून शहर अभियंता हे पद रिक्त आहे. त्या पदाचे कामकाज मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे सोपवण्यात आले होते. सहशहर अभियंता भागवानी यांच्याकडे असेलेले बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कामकाज आता सहशहर अभियंता सेठिया यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, स्थापत्य विभागाचे उपअभियंता सुदर्शन वहिकर यांची कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news