Pimpri Chinchwad BRT Bus Shortage: पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीसाठी बसांची कमतरता; पीएमपीएलवर संताप

कोट्यवधी खर्चानंतरही अपुरी सेवा; प्रवाशांना बससाठी दीर्घ प्रतीक्षा, महापालिका सेवा ताब्यात घेण्याच्या तयारीत
PMPML
PMPMLPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) कंपनीस संचलन तूट, विविध पासेस, बोनस, वेतनाचा फरक, बस खरेदी आदींसाठी दरवर्षी तब्बल सव्वातीन ते साडेतीन कोटी रुपये दिले जातात. महापालिकेकडून बीआरटी मार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. बस डेपो, आगार, थांब्यांसाठी मोक्याची मोफत जागा दिली गेली. खर्चाच्या या तुलनेत पिंपरी-चिंचवडला खूपच कमी बस पुरविल्या जात आहेत. त्यामुळे शहरात तसेच, बीआरटी मार्गावर बस संख्या अपुरी असल्याने प्रवाशांना सुलभ व गतिमान प्रवासी सेवा मिळत नाही. पीएमपीएलच्या या कारभारावर शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

PMPML
Pimpri Chinchwad Vadapav Price Hike: भोसरीत वडापाव महाग; दरवाढीचा खवय्यांच्या खिशाला फटका

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर मिळून पीएमपीएल कंपनी स्थापन करून प्रवासी बस सेवा सुरू करण्यात आली. त्या कंपनीस पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के आणि पुणे महापालिका 60 टक्के निधी देते. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी देऊनही शहराला आवश्यक संख्येनुसार बस पुरवल्या जात नाहीत. खराब, नादुरूस्त अशा बस शहरात पाठवल्या जातात. पुरेशा संख्याने बस नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटीचे एकूण 60 किलोमीटर अंतराचे सहा मार्ग आहेत. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद आहे. मात्र, दर पाच मिनिटाने बस येत नसल्याने प्रवाशांना बसची बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. परिणामी, बीआरटी मार्ग असूनही नागरिकांना गतीमान सेवा मिळत नाही; तसेच निगा राखली जात नसल्याने बीआरटी थांब्यांची दुरवस्था झाली आहे.

PMPML
YCM Hospital Birth Certificate Issue: वायसीएम रुग्णालयात जन्मनोंदणीतील हलगर्जीपणा; पालकांची धावपळ

संचलन तुटीसह विविध पासेस, बोनस, वेतनाचा फरक, बस खरेदी आदीसाठी महापालिका दरवर्षी तब्बल सव्वातीन ते साडेतीन कोटी रुपये पीएमपीएलला देते. कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेकडून डीपीअंतर्गत बीआरटी मार्ग विकसित करण्यात आले आहेत. बीआरटी मार्ग, थांबे व बॅरिकेट्सची सतत दुरूस्ती केली जाते. तसेच, बस डेपो, आगार, थांब्यांसाठी महापालिकेने शहरातील मोक्याच्या जागा मोफत जागा दिल्या आहेत. पीएमपीएलवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्या तुलनेत शहराला सक्षम बस सेवा पुरवली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

PMPML
Pimpri Chinchwad Metro Issue: पिंपरी-चिंचवड मेट्रो कामामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था

‌‘बीआरटी‌’ पुण्यात बंद, पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू

पुणे शहरातील बीआरटी मार्ग तोडून टाकण्यात आले आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्ग यशस्वीपणे सुरू आहेत. त्या मार्गावर दिवसाला दररोज दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. बीआरटी मार्गासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तसेच, वारंवार दुरूस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. सेट मदर टेरेसा उड्डाण पुल तसेच, नाशिक फाटा येथील जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुलावरील एक बीआरटी थांबा एक ते दीड कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले आहेत. बीआरटी मार्गावर सातत्याने खर्च केला जात आहे. त्या तुलनेत बीआरटी मार्गावर बसच्या फेऱ्या होत नसल्याने तो मार्ग महापालिकेस पांढरा हत्ती ठरत आहे. बसने संपूर्ण शहर कनेक्ट नसल्याने तसेच, वेळेवर बस नसल्याने मेट्रो प्रवासी सेवेवरही विपरीत परिणाम होत आहे.

बीआरटी बस सेवा महापालिका ताब्यात घेणार

पीएमपीएलच्या भरवशावर बसल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्गाची वाट लागली आहे. मोठ्या प्रमाणात निधी देऊनही पीएमपीएलकडून आवश्यक प्रमाणात बस पुरविल्या जात नसल्याने प्रवाश्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर तोडगा म्हणून बीआरटी मार्गाची सेवा महापालिका ताब्यात घेण्याच्या विचारात आहे. महापालिकेने बीआरटी मार्ग ताब्यात घेऊन नागरिकांना सेवा दिल्यास ती अधिक जलद होऊ शकते. त्यामुळे मेट्रो तसेच, लोकल तसेच, सायकल मार्गावरील वाहतूक अधिक सक्षम होण्यास बळ मिळणार आहे, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्राकडून पिंपरी-चिंचवडला 200 बस देण्यास नकार

चाळीस लाख लोकसंख्येच्या शहराला बीआरटीएस ही सार्वजनिक बस प्रवासी सेवा अधिक सक्षम होण्यासाठी केंद्राच्या पीएम ईबस सेवाअंतर्गत 200 बसेस देण्यात येणार होत्या. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने केंद्राकडे विनंती केली होती. मात्र, पिंपरी-चिंचवड बीआरटी सेवा स्वतंत्र नसून, ती पुणे शहराशी जोडली गेली असल्याने बस देण्यास केंद्राने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची बीआरटी बस सेवा स्वतंत्र असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

PMPML
Pimpri Vegetable Price: पिंपरीत मटारच्या दरात उसळी; लिंबूही महाग

बीआरटीचे मार्ग सहा

दापोडी ते निगडी, नाशिक फाटा ते वाकड, सांगवी फाटा ते किवळे, काळेवाडी फाटा ते चिखली, दिघी ते चऱ्होली आणि निगडी ते किवळे हे सहा बीआरटी मार्ग आहेत. त्याचे एकूण अंतर 60 किलोमीटर आहे. त्यात एकूण 105 थांबे आहेत. केंद्राच्या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या नियमानुसार 1 लाख लोकसंख्येसाठी 60 बस असणे आवश्यक आहे. त्यानुसार पीएमपीएलकडे 6 हजार बसची गरज आहे. मात्र, पीएमपीएलच्या केवळ 2 ते 2 हजार 200 बसेस पिंपरी-चिंचवह, पुणे व ग्रामीण भागात सध्या धावत आहेत. त्यातही प्रत्यक्षात 1 हजार 800 बस रस्त्यांवर आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला कमी संख्येने बस असल्याचे सांगितले जात आहे.

बस संख्या वाढविण्याचे प्रयत्न

पिंपरी-चिंचवड शहरात सहा मार्गावर यशस्वीपणे बीआरटी बस सेवा सुरू आहे. त्याला नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, बस फेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांच्या तक्रारी आहेत. पीएमपीएलने शहरासाठी बस संख्या वाढवून देण्याबाबत सातत्याने मागणी केली जात आहे. पीएमपीएलकडून नवीन 2 हजार बसेस खरेदी करण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

बीआरटीसाठी पीएमपीएलचे स्वतंत्र व्यवस्थेचा अभाव

बीआरटी मार्गासाठी प्रत्येक पाच मिनिटास बस धावणे, आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. अर्धा तास उलटूनही बस येत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करतात. संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात बसची संख्या अगोदरच कमी आहे. त्यात बीआरटीसाठी बस पुरवणे, त्याचे व्यवस्थापन करणे, यासाठी पीएमपीएलकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. परिणामी, बीआरटी सेवा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news