Pimpri Chinchwad BJP Election: पिंपरी चिंचवडमध्ये भाजप पराभवाचा आढावा घेणार; अहवालानंतर कारवाईचा इशारा

‘अब की बार सौ पार’ नारा अपुरा ठरला; शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंची पत्रकार परिषद, राष्ट्रवादीला सत्तेत न घेण्याचा स्पष्ट निर्धार
BJP strong performance Thane
BJPPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून ‌‘अब की बार सौ पार‌’ नारा देण्यात आला होता; परंतु काही ठिकाणी दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. तर, काही ठिकाणचे उमेदवार कमी मतांच्या फरकाने विजयी झाले. या पराभवाची कारणे शोधून त्याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे दिला जाणार असून, त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

BJP strong performance Thane
Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत मटार-गाजर स्वस्त, पालेभाज्या महाग

या वेळी आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शत्रुघ्न काटे यांनी सांगितले, की नेमक्या कोणत्या कारणामुळे आम्हाला काही प्रभागात पराभव सामना करावा लागला त्याची कारणे शोधत आहोत.

BJP strong performance Thane
Yashwantrao hospital server down: सर्व्हर डाऊनचा फटका; यशवंतराव रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प

तेथे कोणी पक्षविरोधी काम केले असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. शहरातील वाढत्या लोकसंख्येस अतिरीक्त पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दिवसाआड पुरेशा प्रमाणात पाणी दिले जाईल. दरम्यान, विकास आरखाडा प्रकरणात ज्या ठिकाणी चुकीचे आरक्षण पडले होते, त्यासाठी आरक्षण रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

BJP strong performance Thane
PCMC Vote Counting : मतमोजणीच्या दिवशी चिखलीत गोंधळ; पोलिस-प्रशासनातील समन्वयाचा फज्जा

मेट्रोचे विस्तारीकरण, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, नियमित पाणीपुरवठा, नदी सुधार योजना, आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा, महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका देशात प्रथम क्रमांकाने ओळखली जावी यासाठी नियोजन केले जाईल.

BJP strong performance Thane
PCMC Election Result Analysis: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदारांचा कौल बदलला; भाजप-राष्ट्रवादीचे 44 माजी नगरसेवक पराभूत

राष्ट्रवादीचा सहभाग नसेल

महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महापौर आरक्षण सोडत जाहीर होईल. त्यानंतर महापौरांची निवड होईल. दरम्यान, भाजपचा महापौर होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करुन घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, महापौर हा शहराचा असेल, तो कोणत्या विधानसभा मतदारसंघाचा नसेल, असेही शहराध्यक्ष काटे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news